भंडारा बातम्या
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / भंडारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ ऑक्टोबर रोजी कायदेविषयक व विविध शासकीय व लोक कल्याणकारी योजनांचा महाशिबिर (महामेळावा) आयोजित करण्यात येणार आहे. या महाशिबिराच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय आज झालेल्या बैठकीला जिल्हा विदेशी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलिंद कुमार बुरांडे, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण तसेच विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.महाशिबिराच्या नियोजनासाठी प्रत्येक शासकीय विभागाने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच प्रत्येक विभागाने आवश्यक असलेल्या स्टॉल्सची संख्या तसेच शिबिरात लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची निश्चित यादी पूर्वीच सादर करावी, अशा सूचना यावेळी देण्या...
बातम्या -
Bhandara
- लोकसंवाद-२०२६ अभियानांतर्गत सोमनाळा व पिंपळगाव येथे उपक्रमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर लोकसंवाद-२०२६ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळांच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे तसेच पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.या उपक्रमांतर्गत विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ९ सप्टेबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सेवा परमोधर्म या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकापर्यंत सेवा पोहोचविण्यांच्या अविरत प्रयत्न केला आहे.त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे मार्फत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे.सदर अभियान शासकीय/अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, शासकीय आदिवासी मुलाचे-मुलींचे वस्तीगृह, नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा, सैनिकी शाळा तसेच जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावामध...
बातम्या -
Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : स्वच्छ व हरीत गावं सामिती गणेशपुर (भंडारा) च्या वतीने गणेशपुर येथील नेहरू वार्डमध्ये गणेश चतुर्थीच्या पर्वावर १४/०९/२०२६ ला यावेळी जि.प. सदस्य यशवंत सोनकुसरे तसेच माजी न्यायाधीश मा. महेंद्र गोस्वामी यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ व हरीत गाव समिती गगणेशापुरच्या वतीने यावर्षी १०० झांडाचे रोपण करण्यात आलेले असुन सन २०२५ मध्ये सुध्दा समितीव्दारे १२५ वृक्षाची लागवड करण्यात आली त्यापैकी ११५ झाडे जिवंत असून त्यांची उत्तम प्रकारे काळजी समितीच्या वतीने घेतली जात आहे.या समितीच्या सदर कार्याची दखल सामाजिक वनीकरण विभागाने घेतलेली असुन विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवुन वृक्ष लागवडीची माहिती घेतली व सहकार्याचे आश्वासन दिले. सर्व वृक्षांच्या सरंक्षणासाठी विविध मान्यवरांकडुन देणगीव्दारे कठडयांची ...
बातम्या -
Bhandara
- मोटार अपघाताच्या प्रकरणात २८९१२०० रुपये नुकसान भरपाई पिडित पक्षकारांना मिळाल्यामुळे पिडीतांना दिलासाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार भंडारा जिल्हा न्यायालयात व तालुका न्यायालयात १२ सप्टेंबर, २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लाखनी दिवाणी न्यायालयातील लोक अदालतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुरचे प्रशासकीय न्यायमुर्ती, किलोर यांच्या हस्ते व आनंद, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा, नितीन रहांगडाले अध्यक्ष, सचिव विधी सेवा प्राधिकारण मिलिंदकुमार बुराडे, अध्यक्ष तालुका वकील संघ भुसारी, यांच्या उपस्थितीत झाले. तसेच दिवाणी न्यायालय पवनी येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन...
बातम्या -
Bhandara
- इच्छुक उमेदवारांकडून २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविलेविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी थेट अभिकर्ता (Direct Agent) नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्जाचा नमुना जवळच्या डाक कार्यालयात उपलब्ध आहे.थेट अभिकर्ता पदासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे आणि शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेरोजगार किंवा स्वयंरोजगारित शिक्षित युवक, माजी जीवन विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका तसेच सेवानिवृत्त शिक्षक आदी उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, अर्जदार सध्या अन्य कोणत्याही विमा कंपनीचा एजंट नसावा.उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, परस्पर संबंधाचे ...
बातम्या -
Bhandara
- भंभोडी (सात्या) आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला; मृतदेहाजवळच वाघ आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरणविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील पाटेकुर्रा पहाडी जंगल परिसरात भंभोडी (सात्या) आणण्यासाठी गेलेल्या ७३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. वातू बकाराम राऊत ७३ वर्ष, रा. झुरकुटोला असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे झुरकुटोला व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, वातू राऊत हे मंगळवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास पाटेकुर्रा पहाडी जंगल परिसरात भंभोडी (सात्या) आणण्यासाठी गेले होते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.वातू राऊत यांचा दिव्यांग मुलगा व...
बातम्या -
Bhandara
- ५४ गणेश मंडळांची नोंदणी; सर्वाधिक ११ मंडळे लाखनी शहरातीलविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू असून, यंदाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने, शांततेत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत यंदा एकूण ५४ गणेश मंडळांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २६ गावांत रोषणाई, सजावट तसेच बॅनर-पोस्टर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध तयारीमध्ये व्यस्त असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.२६ गावांत एक गाव, एक गणपती -गावातील नागरिकांमध्ये एकोपा वाढावा, विविध गटांतील मतभेद व वादविवाद टाळता यावेत आणि सर्वांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करावा, या उद्देशाने एक गाव, एक गणपती उपक्रम राबविला जात आहे. या...
बातम्या -
Bhandara
- ५४ गणेश मंडळांची नोंदणी; सर्वाधिक ११ मंडळे लाखनी शहरातीलविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू असून, यंदाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने, शांततेत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत यंदा एकूण ५४ गणेश मंडळांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २६ गावांत रोषणाई, सजावट तसेच बॅनर-पोस्टर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध तयारीमध्ये व्यस्त असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.२६ गावांत एक गाव, एक गणपती -गावातील नागरिकांमध्ये एकोपा वाढावा, विविध गटांतील मतभेद व वादविवाद टाळता यावेत आणि सर्वांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करावा, या उद्देशाने ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविला जात आहे. ...
बातम्या -
Bhandara
- उपचारादरम्यान भंडारा जिल्हा रुग्णालयात प्राण गमावले; पत्नी, दोन चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगरविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : शेतामध्ये औषधांची फवारणी करण्यासाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुण शेतमजुराचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वाही येथील शेतशिवारात घडली. चंद्रशेखर मुर्लीधर घुगूसकर ३३ वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे घुगूसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.चंद्रशेखर घुगूसकर हे १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास वाही येथील शेतशिवारात औषधांची फवारणी करण्यासाठी गेले होते. शेतात फवारणीचे काम सुरू असताना अचानक सापाने त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पवनी येथे दाखल केले.मात्र, उपचार सुरू अस...