संजय दुर्गे च्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकरी धडकले मरपल्ली पोलीस मदत केंद्रावर, जिल्हा परिषद उपाध्यक्षांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
तालुका मुख्यालयापासुन ६० किमी. अंतरावर असलेल्या मरपल्ली येथे २३ सप्टेंबर  रोजी संजय बापू दुर्गे नामक इसमाची हत्या करण्यात आली. मात्र त्याच्या मारेकऱ्यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. यामुळे मरपल्ली येथील नागरिकांनी मरपल्ली पोलीस मदत केंद्रावर धडक देऊन  मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. 
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार  , जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम , मरपल्ली च्या सरपंचा सीताबाई वेलादी,  उमानूर च्या सरपंचा  तारक्का आसाम ,   गोविंदगाव चे सरपंच  परशुराम नानी , अशोक झाडे ,  कार्तिक तोगम, शंकर कोंडागुले, बबलू शेक,  नारायण कोंडागुरले,  वेंकटी कोंडागुरले व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
संजय बापू दुर्गे हा  गावातील एक हुशार व्यक्ती होता. मरपल्ली गावात त्यांची शेती आहे. शेतीचा   जुना वाद होता.  शेतीच्या जुन्या वादातून त्याला  मारहाण देखील करण्यात आली व  त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील मारहाण करण्यात आली .  त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन - तीन महीन्याआधी संजयची बाजू खरी ठरली.  हाच जुना वाद संजय बापू दुर्गे याच्या मृत्यूला  कारणीभूत ठरला  आहे. जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना मारण्याची धमकी दिली होती. हत्येच्या दिवशी संशयीत आरोपी  संजयसोबत दिवसभर  होते. सायंकाळी ८ ते ९ वाजता कोत्तागूडम वरुन बाहेर नेण्यात आले . राञभर पती घरी न आल्याने संजयची पत्नी दर्शना  संजय दुर्गे हिने पहाटे छञु दुर्गे व पत्नी यांना विचारले असता ३ वाजता घरी गेल्याचे सांगितले.  नंतर आरोपी धंनजय ची सून रंजीता प्रेमनंदन डोंगरे हिला विचारले असता तिचा पती १ वाजता घरी आल्याचे सांगितले. पण काही वेळा नंतर व्येंकटी चंद्रया दुर्गे यांनी आपल्या शेतात प्रेत असल्याचे सांगत आला . नंतर संजयच्या पत्नीने  पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु अजूनपर्यत मुख्य आरोपी  बाहेरच आहे. संशयीत आरोपींना अटक करण्यात आली परंतु योग्य चौकशी करून मुख्य आरोपीना अटक केली नाही . यामुळे आज सकाळी   संजयची पत्नी दर्शना संजय दुर्गे यांच्या निवेदनाद्वारे पोलीस मदत केंद्र  मरपल्ली येथे सादर केले.  गावातील पुर्ण नागरीक यांच्या उपस्थितीत उपपोलिस स्टेशन मरपल्ली येथे मोठी सभा घेण्यात आली व मुख्य आरोपीना चौकशी करून लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडुन करण्यात आली.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-01


Related Photos