कोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री


- व्हिडीओ काॅन्फरन्सींगद्वारे प्रशासनाला दिले कडक निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे होऊ घातलेल्या लाॅयड मेटल अॅन्ड एनर्जी कंपनीच्या लोहप्रकल्प उभारीणीसाठी लागणाऱ्या  सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे लोहप्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांकडून  आढावा घेतला. कोनसरी येथे होणारा लोहप्रकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण आहे. यामुळे प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणार्या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. आवश्यक परवानग्या तातडीने देण्यात याव्यात. तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. एमआयडीसने जमिन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. शेतकर्यांनासुद्धा  मोबदला देण्यात आला आहे. वनविभागालासुध्दा जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी सांगितले. जमीन गेलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या  कुटूंबातील एका सदस्यास नोकरी देण्याचा करार करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, अशाही सुचना मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिल्या. 
गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच उद्योग निर्मीतीचा पाया रोवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घ्या, असेही निर्देश ना. फडणवीस यांनी दिले.
व्हिडीओ काॅन्फरसिंगला सहाय्यक जिल्हाधिकारी , वनविभाग, महावितरण तसेच जिल्ह्यातील इतरही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-24


Related Photos