महत्वाच्या बातम्या

 लोकबिरादरी हेमलकसा येथे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न


डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय डॉ. प्रकाशभाऊ आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी विशेष उपस्थिती लावून सर्व खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीलाधर कसारे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रेणुकाताई मनोहर, जमीर शेख, शरीफ शेख सर व तालुका क्रीडा संयोजक विशाल तावेडे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक मार्गदर्शन करून खेळाडूंचा उत्साह वाढवला. स्पर्धेत निरनिराळ्या वयोगटांत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. १४ वर्षे मुलींच्या गटात सीमा विजय वड्डे हिने प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षे मुलांच्या गटात प्रयाग सचिन मुक्कावार (प्रथम), आर्यन मनेश तिम्मा (द्वितीय) व माऊली गणेश हिवरकर (तृतीय) यांनी यश मिळवले. 

१७ वर्षे मुलींच्या गटात कोमल प्रकाश पुंगाटी (प्रथम), संगिता रामजी दुर्वा (द्वितीय) व सुशीला बाजू मडावी (तृतीय) यांनी बाजी मारली. १७ वर्षे मुलांच्या गटात बलदेव राजू महाका (प्रथम), रोहित चंदू महाका (द्वितीय) व पियुष रमेश कांदो (तृतीय) यांनी प्राविण्य मिळवले. तसेच १९ वर्षे मुलींच्या गटात संगिता सखाराम पुंगाटी (प्रथम) व उर्मिला झुरू ताडो (द्वितीय), तर १९ वर्षे मुलांच्या गटात अर्जून लिंगू आलामी (प्रथम) व ओमकार संजय मडावी (द्वितीय) यांनी यश संपादन केले.

सर्व प्राविण्यप्राप्त खेळाडूंची विभागीय मल्लखांब स्पर्धेकरिता निवड झाली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दुबे सर, चापले सर, पवार सर, गुट्टेवार सर, अमोल सर, सचिन सर, तुषार सर, हिना गुट्टेवार मॅडम यांच्यासह लोकबिरादरी प्रकल्पातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लखांब प्रशिक्षक परमात्मा पंधरे यांनी केले.





  Print






Related Photos