महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर


- १५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 से 18 अश्वशक्ती मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येते. चालू वर्षासाठी अटी व शर्तींनूसार मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र ठरलेल्या बचत गटांना वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्‌यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. अनुदानाची रक्कम 3.15 लाख रुपये अनुज्ञेय राहील. चालू आर्थिक वर्षातील बचत गटांची निवड केल्यानंतर लाभार्थी बचत गटाने किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची खरेदी करावी.परंतु जे लाभार्थी बचत गट मंजूर अनुदाना व्यतिरिक्त अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची खरेदी कर इच्छित असतील, असे पात्र ठरलेल्या बचत गटांना ते खरेदी करता येतील. या योजनेत स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने त्यांना देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याला मिनी ट्रॅक्टर विकता येणार नाही अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. ज्या लाभार्थ्यांना पावर टिलरचा लाभ दिला आहे. त्या लाभार्थींना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. सन 2012-13 ते 20-21 मध्ये ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे. त्यांना चालू वर्षाकरिता अर्ज करता येणार नाही. अटी व शर्तीची पूर्तता करीत असलेल्या नागपूर जिल्हयातील इच्छुक स्वयंसहायता बचत गटांनी प्रत्यक्ष या कार्यालयात येवून अर्ज घेवून जावववववे. परिपूर्ण अर्ज भरून विनाविलंब 15 डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत कार्यालयीन वरील पत्यावर अर्जात नमूद केलेल्या पूर्ण कागदपत्रा प्रमाणे पाठवावा.





  Print






News - Nagpur




Related Photos