महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली: शाळेकरिता निघालेल्या शिक्षकाचा वाटेतच मृत्यू


हृदरविकाराचा झटका आल्याचे अंदाज 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील इरपणार येथील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक आज सकाळी ९ वाजता शाळेत जाण्याकरिता दुचाकीने निघाले असता वाटेतच त्यांच्या दुचाकीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . 

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या इरपणार येथील शिक्षक आज शनिवार सकाळच्या शाळेकरिता भामरागड येथून आपल्या दुचाकीने निघाले होते वाटेतच ते दुचाकीवरून खाली पडले असून त्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . 

 मारोती निमसरकार वय ४७असे मृत शिक्षकाचे नाव असून दुचाकी चालवत असतांनाच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे बोलल्या जात आहे .शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल . सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 

  Print


News - Gadchiroli
Related Photos