डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केबीसी मध्ये जिंकले २५ लाख, आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करणार रक्कम


-  महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकल्पाला २५ लाखांची  आर्थिक मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोनी टीव्ही वरील 'कौन बनेगा करोडपती' या गेम शो मध्ये खेळून डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी  २५ लाख रुपये जिंकले. तसेच महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतःकडून  रुपये २५ लाखांची देणगी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी दिली आहे. कार्यक्रम झाल्यावर त्यांनी २५ लाख रुपयांची देणगी प्रकल्पासाठी देत असल्याचे सांगितले आणि स्वतःचे २५ लाख रुपये महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात जमा केले आहेत. ही संपूर्ण रक्कम आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करणार असल्याचे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले आहे. 
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या देणगीचा  कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही हे  विशेष आहे. त्या बद्दल आम्ही प्रकल्पातर्फे त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम अजून दूरवर जाऊन पोहोचले आहे. महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यातील जनतेपर्यंत हे कार्य पोहोचले आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा आहे. लोक बिरादरी प्रकल्पावर नितांत प्रेम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक व तसेच सर्व भारतातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने आमचा काम करण्याचा उत्साह द्विगुणित होत असतो. सुसज्य दवाखान्यात चांगली आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, बांबू हस्तकला, पाण्यासाठी गावागावात मोठे तलाव व गाव विकास अशा कार्यातून या भागातील आदिवासी बांधवांचा विकास साधण्याचा आम्ही ध्येयाने प्रेरित असलेल्या कार्यकर्त्यांच्या साथीने निरंतर प्रयत्न करीत आहोत आणि करीत राहणार,  असे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाले.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos