उमरेड - चिमूर मार्गावर मालेवाडा जवळ भीषण अपघात, २ शालेय विद्यार्थी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / उमरेड / चिमूर :
  भिवापूर तालुक्यातील मालेवाडा (गोटाली) येथे दोन कुटुंबावर आज काळाने डाव साधला, आज   १४  ऑगस्ट  रोजी भिसी येथील महात्मा गांधी विद्यालयात  शिकत असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांना  उमरेड कडून येणाऱ्या एम एच ३४ -एम ९२२३  क्रमांकाच्या ट्रकने मालेवाडा (गोटाली)  बसस्थानकावर शाळेत जाण्यासाठी एस टी बस ची वाट पाहत असतांना  चिरडले.  यात दोन्ही विद्यार्थी  जागीच ठार झालेत.  तर एक विद्यार्थी  गंभीर जखमी झाला आहे. 
अनुराग नेताजी मेश्राम  (१३) आणि प्रवीण उल्हास रामटेके (१८) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून हिमांशू बाळा शेंडे (१३) हा विद्यार्थी  जखमी झाला आहे.  अपघात होताच मालेवाडा येथील नागरिकांनी विध्यार्थ्यांना ट्रक खालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विदयार्थी  ट्रकच्या पल्ल्याखाली मुरुममध्ये दबून असल्यामुळे गावकऱ्यांनी  जे सी बी च्या साहाय्याने विद्यार्थ्यांना  बाहेर काढले.  या घटनेमुळे मालेवाडा येथे   तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  हर्षल एकटे आपल्या चमूसहित उपस्थित होऊन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.  पुढील  तपास भिवापूर पोलीस करीत आहेत.   Print


News - Nagpur | Posted : 2018-08-14


Related Photos