महत्वाच्या बातम्या

 वार्डा- वार्डातील बूथ रचना व शक्ती केंद्र मजबुत करा : जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन


- गडचिरोलीत भाजप शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी निवडणुका व भाजपचे संघटन वाढविण्याचा दृष्टीने गडचिरोली शहरातील शक्ती केंद्र व बुथ रचना मजबूत करणे आवश्यक असून पक्षाकडून तसे निर्देश आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे लोकांपर्यन्त पोहोचवून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळेल यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन आपापल्या वार्डातील बुथ रचना मजबूत करण्यावर भर द्यावा व तसेच शक्ती केंद्र मजबूत करून वार्डा-वार्डातील बुथ रचनेच्या कार्यकारिणी गठित करून एका बुथवर 30 पुरुष सदस्य तर 20 महिलाही सदस्य म्हणून ठेवण्यात याव्या.  बुथ कार्यकारीणी मजबूत करून शक्ती केंद्रप्रमुखांनी बुथ रचनेचा आढावा घ्यावा व पक्षाची ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे व आगामी निवडणुका लक्षात घेता आतापासूनच कामाला लागून नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले. गडचिरोली शहराच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक आज 22 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला प्रामुख्याने भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगिता पिपरे गडचीरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर जी. काटवे महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविता उरकुडे शहराचे महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, तालुक्याचे महामंत्री हेमंत बोरकुटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हर्षल गेडाम भाजपचे ज्येष्ठ नेते चिचघरे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम युवा मोर्चाचे राजू शेरकी, गडचिरोली शहर दलित आघाडीचे शहर अध्यक्ष प्राध्यापक उराडे विलास नैताम देवाजी लाटकर रश्मी बाणमारे भावना हजारे पूनम हेमके व भाजप गडचिरोली शहराचे पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत पक्षाची शक्तीकेंद्र व बूथ केंद्राची रचना मजबूत करण्यासंदर्भात व धन्यवाद मोदीचे पोस्ट कार्ड नागरिकाकडून स्वीकारण्याबाबत मार्गदर्शन भाजपचे जिल्हा महामंत्री यांनी केले, तसेच शहरातील प्रत्येक वार्डातील केंद्र व राज्य शासनाच्या जीवनावश्यक योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांकडून धन्यवाद मोदीजींचे पोस्टकार्ड भरून घेऊन ते पक्षाकडे पाठवण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos