महत्वाच्या बातम्या

 कोइंदुळ गावातील नालेसफाई सुरू : CPI ने नागरिकांचे काम करून दिले!


- गावकऱ्यांनी बैठकीत मांडली समस्या; CPI च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाकडून कामाला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या कोइंदुळ गावातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावातील नाल्यांमध्ये कचरा, गाळ आणि सांडपाणी साचल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गावकऱ्यांनी गावात बैठक आयोजित करून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) च्या पदाधिकाऱ्यांना बोलावले आणि मदत करण्याची मागणी केली. गावकऱ्यांची समस्या समजून घेत CPI ने पुढाकार घेऊन पंचायत समिती एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आणि नालेसफाई तातडीने करण्याची मागणी केली. CPI च्या पाठपुराव्यानंतर नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे काम करून देण्यात CPI ला यश आले आहे.

सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य -
गावातील नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोइंदुळ गावातील नागरिकांनी बैठकीसाठी आम्हाला बोलावून नालेसफाईच्या समस्येबाबत मदत मागितली होती. आम्ही त्यांच्या समस्येची दखल घेऊन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. त्यानंतर नालेसफाई सुरू झाली, ही समाधानाची बाब आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी आणि गावातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी CPI यापुढेही जनतेसोबत राहून संघर्ष करेल.

गावातील नालेसफाईचे काम पूर्ण करावे, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि नियमित स्वच्छता राखावी, अशी मागणी CPI आणि गावकऱ्यांनी केली आहे. या पाठपुराव्यात CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार आणि कोइंदुळ गावातील नागरिक सहभागी होते.





  Print






Related Photos