दहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत


- महसूल व वनविभागाने जाहिर केले सुधारित निकष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दहशतवाद, दंगलग्रस्त, नक्षली हल्ला अशा घटनांमध्ये हात, पाय, डोळे अथवा शरिरातील कोणताही अवयव निकामी झाल्यामुळे अपंगत्व आल्यास शासन ५० हजार रूपयांपासून २ लाखांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे. याबाबत शासनाच्या महसूल व वनविभागाने आज १५ सप्टेंबर रोजी शासकीय पपिपत्रक निर्गमित केले आहे.
नवीन निर्णयानुसार घटनांमध्ये २५ ते ३९ टक्के अपंगत्व असल्यास ५० हजार रूपये, ४० ते ६०  टक्के अपंगत्व असल्यास १ लाख रूपये आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास २ लाख रूपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जखमी व्यक्ती ३ दिवसांच्या कालावधीत रूग्णालयात दाखल झाला असल्यास ३ हजार रूपये, ३ दिवसांपुढील प्रत्येक दिवसाकरीता एक हजार रूपये असे १४ दिवसापर्यंत १४ हजार रूपये दिले जाणार आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-15


Related Photos