महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सुलभ करण्यावर शासनाचा भर - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बातम्या - Bhandara

आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सुलभ करण्यावर शासनाचा भर - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या स्थितीचा आढावाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी सुलभ करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तेथील त्रुटी व कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा साकोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अजिंक्य अंबा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच प्रयत्न करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे प्रशासनाला निर्देश बातम्या - Bhandara

जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच प्रयत्न करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे प्रशासनाला निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात सध्या थेट दुष्काळसदृश परिस्थिती नसली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाच्या तुटीमुळे काही भागांत धान व इतर पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. विशेषतः धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, जलाशयांमधील पाणीसाठा, सिंचन व्यवस्था, पिकांची सद्यस्थिती तसेच संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, खासदार प्रशांत पडोळे, आम...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सोमनाळा येथे लोकसंवाद मधून महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती बातम्या - Bhandara

सोमनाळा येथे लोकसंवाद मधून महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती


- शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांशी साधला थेट संवाद विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्काच्या विशेष उपक्रमांतर्गत सोमनाळा येथील बाल गणेश उत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला व बालकांचे संरक्षण, दत्तक प्रक्रियेतील कायदेशीर बाबी तसेच विविध शासकीय योजनांबाबत यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी प्रियंका पशीने यांनी महिला व बालकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय यंत्रणा, बालकांवरील अत्याचार, बालविवाह, बालमजुरी व बालकांशी संबंधित अन्य गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत त्यांनी मार्गदर्शन ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सोमनाळा येथे लोकसंवाद मधून महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती बातम्या - Bhandara

सोमनाळा येथे लोकसंवाद मधून महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती


- शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांशी साधला थेट संवाद विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्काच्या विशेष उपक्रमांतर्गत सोमनाळा येथील बाल गणेश उत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला व बालकांचे संरक्षण, दत्तक प्रक्रियेतील कायदेशीर बाबी तसेच विविध शासकीय योजनांबाबत यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी प्रियंका पशीने यांनी महिला व बालकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय यंत्रणा, बालकांवरील अत्याचार, बालविवाह, बालमजुरी व बालकांशी संबंधित अन्य गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत त्यांनी मार्गदर्शन ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नवबजरंग गणेश मंडळात लोकसंवाद : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बातम्या - Bhandara

नवबजरंग गणेश मंडळात लोकसंवाद : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : शहरातील मानाचा महागणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवबजरंग गणेश मंडळाच्या १०५ व्या वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मंडळाच्या परिसरात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, उपक्रम तसेच विकासकामांची माहिती नागरिकांना देण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी क्रीडांगण व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.या योजनेंतर्गत ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील सुरक्षारक्षक भरतीच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन बातम्या - Bhandara

प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील सुरक्षारक्षक भरतीच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन


- राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेमार्फत सध्या कोणतीही अधिकृत सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया सुरू नाहीविदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी/  भंडारा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरक्षारक्षक पदांची भरती करण्यात येत असल्याच्या अफवा तसेच विविध माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करणारे संदेश प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राज्य शासन किंवा जिल्हा परिषद, भंडारा यांच्यामार्फत सध्या कोणत्याही प्रकारची सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक पदासाठी अर्ज, नोंदणी, कागदपत्र पडताळणी किंवा नियुक्तीच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास अथवा वैयक्तिक माहिती मागितल्यास नागरिकांनी सावध राहावे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भंडारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी जमावबंदी आदेश लागू : अनंत चतुर्दशी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय    बातम्या - Bhandara

भंडारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी जमावबंदी आदेश लागू : अनंत चतुर्दशी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय  


विदर्भ न्युज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात अनंत चतुर्दशी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एकूण ७५९ सार्वजनिक गणेशोत्सवांची स्थापना करण्यात आली असून, १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विसर्जन सोहळे पार पडणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, सण व उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजल्यापासून २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची शस...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवा संकल्प अभियान-२०२६चा शुभारंभ : जिल्हा परिषद सदस्या धृपता मेहर यांच्या हस्ते सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी बातम्या - Bhandara

सेवा संकल्प अभियान-२०२६चा शुभारंभ : जिल्हा परिषद सदस्या धृपता मेहर यांच्या हस्ते सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : आदिवासी विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियान-२०२६ चा शुभारंभ आज शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा, खापा (खुर्द), ता. तुमसर येथे जिल्हा परिषद सदस्या श्रीमती धृपता मेहर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या सेवा चित्ररथा ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक एम. हेडाऊ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (विकास) के. पी. बडगे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) पी. बी. इंगोले, कार्यालयीन अध्यक्ष एस. जी. वैरागडे, मुख्याध्यापक महेश हातझाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष नलुताई मरस्कोल्हे, सदस्य रमेश मरकाम, आदिवासी पालक घनश्याम उईके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आदिवासी भागात...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवा संकल्प अभियानातून शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवा : जि.प. उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर यांचे निर्देश बातम्या - Bhandara

सेवा संकल्प अभियानातून शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवा : जि.प. उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर यांचे निर्देश


- भंडारा जिल्ह्यात सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा थाटात शुभारंभ- स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा गौरव, जि.प. परिसरात स्वच्छता श्रमदानविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची चांगली सुरूवात जिल्ह्यात झाली असून विविध विभाग उत्साहात कामाला लागले आहेत. शेवटच्या घटकांपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ पोहचवावा असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर यांनी केले. भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने आज १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा संकल्प व स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ् करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर, आरोग्य समिती सभापती आनंद मल्लेवार, जि.प. सदस्य विनोद बांते, जि.प.सदस्य ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस आणि वाहनांच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे : जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन बातम्या - Bhandara

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस आणि वाहनांच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे : जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची बैठक नूरुल हसन पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा येथे पार पडली सदर बैठकीमध्ये समितीचे सदस्य उपस्थतीत होते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस आणि वाहनांच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि विद्यार्थ्यांचा प्रवास अपघातमुक्त व सुरक्षित राहावा, यासाठी पोलीस अधीक्षकांनी सर्व संबंधित विभाग व शाळा व्यवस्थापनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत शालेय वाहतूक करणाऱ्या प्रत्येक बसचे फिटनेस प्रमाणपत्र (Fitness Certificate), विमा (Insurance), पीयूसी (PUC), आरसी बुक आणि वैध परवाना (Permit) असणे अनिवार्य आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने स्वतःची स्वतंत्र शाळा परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीने नियमितपणे शालेय बसेसची सुरक्षितता तपासावी आणि चालकांची माहिती अद्ययाव...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →