महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजना सण २०२२-२३ सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजनेअंतर्गत गडचिरोली जिल्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांकडून (नोंदणीचा अधिनियम १८६० व १९५०) पंजीबंद्ध संस्थांकडून कार्यालयात उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्जाप्रमाण अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या संस्थांच्या अनुदानाकरीता प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांनी विविध समाजसेवा शिबीरांचे आयोजन केले आहे. अशा संस्थांनी विविध नमुना अर्जाप्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव २५ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रस्ताव सादर करावे. अनुदानाबाबतचा विहीत नमुना अर्ज कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येतील.

तरी या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव सादर करावे, असे आव्हान प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली हे करीत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos