सर्वोदय विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात : सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साखरकर यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे शनिवार, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन समारोह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साखरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गजभे होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, सेवानिवृत्त शिक्षक राजेश मारपल्लीवार, संजय वटाणे, दुपारपाळी प्रमुख शिक्षक गाडगीलवार तसेच सकाळपाळी प्रमुख शिक्षक अडवे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती सदाशिव साखरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.शिक्षक दिनानिमित्त वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भेटवस्तू देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करून शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे केली.
यावेळी मुख्याध्यापिका विद्या गजभे, सत्कारमूर्ती साखरकर आणि सेवानिवृत्त शिक्षक मारपल्लीवार यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व शिक्षकांच्या समाजातील योगदानाविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व चॉकलेटचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Petrol Price




