नक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’


वृत्तसंस्था / रायपूर :   छत्तीसगड पोलिसांनी नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात पहिले चित्रपटगृह सुरू केले आहे. यामुळे या चित्रपटगृहाच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांनी पहिल्यांदाच पडद्यावर बाहुबली चित्रपट बघितला आहे. अशाच प्रकारच्या आणखी काही सुविधा विकसित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
 एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित अबूझमाड क्षेत्रात संपर्काच्या साधनांची कमतरता आहे. परंतु, आता या भागात आदिवासी एका मिनी चित्रपटगृहात चित्रपटही पाहू शकतील. गुरुवारी पहिल्या मिनी चित्रपटगृहाचा शुभारंभ झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक सहभागी झाले होते. त्यांनी सुपरहिट ‘बाहुबली’ हा चित्रपट पाहिला. १०० आसनक्षमता असलेल्या या चित्रपटगृहाला ‘बासिंग सिलेमा’ हे नाव देण्यात आले आहे. याचा गोंडी भाषेत अर्थ हा बासिंग सिनेमा असा होता. या चित्रपटगृहात लोक मोफत चित्रपट पाहू शकतात. विविध आदिवासी क्षेत्रासह अबूझमाडमध्ये टेलिव्हिजन आणि मोबाइल जवळपास नव्हतेच. या गावात आठवडी बाजार भरतो. हे वगळता गावात मनोरंजनाचे दुसरे कोणतेच माध्यम नाही.   Print


News - World | Posted : 2018-10-01


Related Photos