गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत २६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास शासनाची मान्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथे काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या महिला व बाल रूग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पध्दतीने २६  पदे भरण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज १४  सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून मान्यता दिली आहे. 
महिला व बाल रूग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत विविध सेवा पुरविण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर विचार करून शासनाने अखेर मान्यता दिली आहे. या कंत्राटी पदभरतीसाठी ४३  लाख २८  हजार ६८८  रूपयांच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे. रूग्णालयात कनिष्ठ लिपीकाची दोन पदे, बाह्यरूग्ण लिपीक २ पदे, भांडार तसेच वस्त्रपाल एक पद, व्रणोपासाक एक पद, शस्त्रक्रियागृह परिचर २ पदे, रक्तपेढी परिचर एक पद, अपघात विभाग सेवक ३ पदे, कक्ष सेवक १०  पदे, प्रयोगशाळा परिचर एक पद आणि शिपायाची दोन पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-14


Related Photos