महत्वाच्या बातम्या

 विविध सामाजिक उपक्रमांनी हंसराज भैय्या अहीर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


- आरोग्यवर्धक दुधाचे वितरण, रूग्णांना फळवाटप, गरजुंना ब्लॅंकेट वाटप, परिचारिकांचा सत्कार यासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पूर्व अध्यक्ष हंसराजभैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 11 नोव्हेंबर 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

चंद्रपुरात भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी व अन्य आघाड्यांच्या वतीने विठ्ठल मंदिर वार्ड येथील हनुमान मंदिर, बायपास रोडवरील अष्टभुजा मंदिर तसेच वढा येथे विठ्ठल रूक्मिनी मंदिर येथे पुजा-अर्चना करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता सामुहिक प्रार्थना केली. वाढदिवसानिमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

नागरिकांचे आरोग्य व आरोग्यविषयक जनजागृतीच्या उद्देशाने शहरातील विविध भागांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आरोग्यवर्धक दुधाचे वितरण करण्यात आले. भाजप कार्यालय गिरनार चौक येथे केक कापून नागरिकांना आरोग्यवर्धक दुध वाटप करण्यात आले. याशिवाय दुर्गा मंदिर एमईएल प्रभाग, इंदिरा नगर भगतसिंग चौक, बंगाली कॅम्प चौक, जनता कॉलेज चौक, मातोश्री शाळेजवळ तुकूम, शहीद भगतसिंग चौक पठाणपुरा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बाबुपेठ, कॅन्टीन चौक लालपेठ, अष्टभुजा मंदिर, कामगार चौक, पडोली चौक आदी ठिकाणी आरोग्यवर्धक दुधाचे वितरण करण्यात आले.

याचबरोबर घोडपेठ, भद्रावती, चंदनखेडा, शेगांव, वरोरा, माढेळी, माजरी, घुग्घूस, बल्लारपूर, सास्ती, राजुरा, विरूर, गडचांदूर, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने आरोग्यवर्धक दुध वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तुकूम येथे परिचारिकांचा सत्कार करून त्यांच्या आरोग्य सेवेतील योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच गरजू नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप व अन्य सेवाभावी उपक्रमही राबविण्यात आले. अशाप्रकारे संपूर्ण दिवसभर जिल्ह्याभरात विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली.

वरील सर्व कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, डॉ. अशोक जिवतोडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा नेते प्रकाश देवतळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून आयोजकांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोहन चौधरी, चंदन अहीर, तुषार सोम, विनोद खेवले, नामदेव डाहुले, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, मनोज पॉल, राजु घरोटे, मयुर हेपट, राजेश वाकोडे, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, स्वप्निल मुन, मयुर भोकरे, प्रा.रवि जोगी, सुभाष आदमने, स्वप्निल डुकरे, प्रदीप किरमे, पराग मलोडे, नकुल आचार्य, अक्षय शेंडे, शाम कनकम, गणेश गेडाम, क्रिष्णा वायकर,  सारीका संदूरकर, आशा देशमुख, दामोदर मंत्री, पुनम तिवारी, गौतम यादव, राजु येले, सलीम शेख, बाबु यादव, सुदामा यादव, उग्रसेन पांडे, जगदीश दंडेले, अंजी मातंगी, रोहीत दुरटकर यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos