महत्वाच्या बातम्या

 भाजपाच्या महिला मेळाव्यासाठी महिला आघाडीचा जिल्हा दौरा


-१४ नोव्हेंबरला आयोजित मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , जिल्हाध्यक्ष योगीता भांडेकर यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चित्रा वाघ यांचा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा दौरा आयोजित असून या दौऱ्याची पूर्वतयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये दौरे कार्यक्रम सुरू असून ९ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आरमोरी, वडसा कुरखेडा व कोरची या तालुक्यांमध्ये दौरा करून सर्व तालुक्याच्या महिला आघाडीच्या बैठका घेण्यात आल्या व सर्व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना १४ नोव्हेंबर रोजी भाजप महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा  चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा महिला मेळाव्याबाबत माहिती देण्यात आली व कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांना गडचिरोली येथे आणण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व आरमोरी, वडसा, कुरखेडा व कोरची तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष, महामंत्री, उपाध्यक्ष व जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. याप्रसंगी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, आरमोरी येथे आयोजित महिला आघाडीच्या तालुका बैठकीला आरमोरीचे तालुका अध्यक्ष नंदू पेट्टेवार, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता रेवतकर व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. तसेच वडसा तालुक्याच्या बैठकीला माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपचे तालुका अध्यक्ष राजू जेठाणी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कविता बारसागडे उपस्थित होत्या. तर कुरखेडा येथील तालुका बैठकीला भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष जयश्री मडावी उपस्थित होत्या तसेच कोरची तालुक्याच्या बैठकीला तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष निलकमल मोहूर्ले उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos