चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर कोर्धा गावाजवळ उभ्या असलेल्या कारला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाले. अपघातात नितीन विनायक भरे (३२) आणि श्रावणी बेदरे (१२) यांचा मृत्यू ,झाला तर हिमेश बेदरे यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.ही दुर्घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० ते १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील विरली येथील हिमेश बंडू बेदरे हे आपल्या कुटुंबीयांसह बल्लारपूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून बोडेगाव येथे परतताना नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील भोतमांगे ढाब्यावर त्यांनी जेवण केले.जेवण आटोपून बोडेगावकडे जात असताना कोर्धा गावाच्या काही अंतरावर नि...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी येथील सुंदरनगर परिसरात दारूच्या ग्राहकावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणाला तिघांनी घरातून बाहेर ओढून आणत मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. यावेळी तरुणाला चाकूने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ईशांत मोघल डांगे १८ वर्ष रा. सुंदरनगर, ब्रम्हपुरी हे रात्री सुमारे ११ वाजता आपल्या घरी जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या वार्डातील दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद हे तिघे त्यांच्या घरी आले.तिघांनी ईशांत यांना गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकांना दारूचा माल का पुरवित आहे, असा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर तिघांनी ईशांत यांना घराबाहेर ओढत सार्वजनिक रस्त्यावर आणले. यावेळी दादू प्रकाश घरडे याने ईशांत यांच्या दोन्ही ग...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : किशोरवयीन विद्यार्थ्यांना बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि कायदेशीर हक्कांची जाणीव व्हावी, तसेच संकटाच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या शासकीय मदत यंत्रणांची माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषद हायस्कूल, गुंजेवाही येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई (बल्लारपूर कॅम्पस) येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महिला व बालविकास विभाग, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी खडसे (येलेकर) यांनी विद्यार्थ्यांना महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये उपलब्ध असलेल्या मदतीची माहिती दिली. पीडित महिलांना समुपदेशन, मानसिक आधार आणि कायदेशीर सह...
बातम्या -
Chandrapur
- पिपरबोडी पारधी टोला येथे सेवा संकल्प अभियान व पारधी समाज मेळावा- जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविणारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पारधी समाज भटकंती करणारा समाज असल्याने अनेक समाजबांधवांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका यासह विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. सेवा संकल्प अभियान च्या माध्यमातून पारधी समाजबांधवांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करू या, असे प्रतिपादनराज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. पिपरबोडी पारधी टोला (चिनोरा, ता. वरोरा) येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित सेवा संकल्प अभियान व पारधी समाज मेळाव्यात ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बल्लारपूर कॉलरी मैदान येथे सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मैदानावरील सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती, बांधकामांची सद्यस्थिती तसेच आगामी कामांच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.बल्लारपूर कॉलरी मैदानाचा आधुनिक पद्धतीने विकास करून परिसरातील खेळाडू आणि युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कामे सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढावा घेण्यात आला. आगामी काळात आवश्यक असलेल्या सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.बल्लारपूर कॉलरी मैदानाच्या विकासासाठी आतापर्यंत ६ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मैदान अधिक आधुनिक, सुविधायुक्त आणि खेळाडूंसाठी उपयुक्त बनविण्यासाठी आगाम...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : वर्ल्ड बांबू वीक निमित्त चंद्रपूरमधील BRTC (बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर) चिचपल्ली येथे आयोजित चार दिवसीय महोत्सवात पार पडलेल्या डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म स्पर्धेत सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरच्या युवा फिल्ममेकर्सने खास यश मिळवले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अवेज अजीज शेख याने प्रथम क्रमांक पटकावला, तर अयान अजीज शेख याने तृतीय क्रमांक मिळवत आपल्यातील सर्जनशीलतेची चुणूक दाखवली.चंद्रपूर येथे शुक्रवार १८ सटेबर ला पार पडलेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात मान.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, उमेश वर्मा डायरेक्टर BRTC व उपस्थित वन्य अधिकारी यांचे हस्ते या दोन्ही विजेत्यांना ट्रॉफी ,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. बांबूच्या उपयोगावर, संवर्धनावर आणि ग्रामीण विकासावर आधारित त्यांच्या या कलाकृतींचे प...
बातम्या -
Chandrapur
- वरोरा तालुक्यात धान व कपाशी पिकांची प्रत्यक्ष पाहणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पाऊस कमी झाला असून त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस झाला नाही किंवा परतीच्या पावसाने पाठ फिरविली तर शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी आणि ठोस उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसु...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे झालेल्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मजल मारली.१९ वर्षांखालील मैदानी स्पर्धेत ओंकार तलांडे याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. धीरज कुकडकर याने ८०० मीटर तसेच १५०० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. भाविक बुरे याने ८०० मीटर व १५०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. श्रावणी पेंदाम हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर समीर मानकर याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेचा मार्ग निश्चित केला आहे. त्यांच्या यशा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : रामपूर ते माथा मार्गालगत जंगल परिसरात कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशांची बाजी लावत जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच झुंजी लावणारे इसम घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मोटारसायकली, जखमी कोंबडा आणि झुंजीसाठी वापरण्यात येणारी लोखंडी काती असा एकूण ५ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.१८ सप्टेंबर रोजी राजुरा पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. यावेळी रामपूर ते माथा मार्गालगतच्या जंगल परिसरातील मोकळ्या जागेत काही इसम कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशांची बाजी लावत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.पोलिस पथक घटनास्थळाजवळ पोहोचताच तेथे कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या इसमांनी पो...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द शाखा डाकघरातील खातेदारांकडून बचत, आवर्ती ठेव व इतर योजनांमध्ये जमा करण्यासाठी स्वीकारलेल्या रकमेत सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखा डाकपालाविरुद्ध कोरपना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवेक बाळू बनसोडे (वय २८, रा. मराठी शाळेजवळ, भीमनगर, सांगोला, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शाखा डाकपालाचे नाव आहे. ते कोळशी खुर्द शाखा डाकघरात ३ सप्टेंबर २०२२ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत कार्यरत होते.डाक निरीक्षक अनिल गोविंदराव टेकाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मार्च २०२५ रोजी बनसोडे यांनी वैद्यकीय रजेचा अर्ज दिला होता. त्यानंतर २६ मार्च रोजी कोळशी खुर्द येथील शाखा डाकघर बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर डाक निरीक्षक व टपाल पर्यवेक्षक मिथुन टोंगे यांनी तेथे भेट दिली. डाकघर बंद अ...