चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : एका बाजूला ताडोबाच्या जंगलात मुक्तपणे वावरणारे वाघ, बिबट्या, अस्वल आणि गौर... तर दुसऱ्या बाजूला याच जंगलाच्या कुशीत राहणारी गावे. वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मुलांना मोकळ्या जागेत खेळण्यासाठी पाठविताना पालकांच्या मनात धाक निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही निवांत बसण्यासाठी सुरक्षित जागांचा अभाव जाणवतो. अशा परिस्थितीत माणूस आणि जंगल यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने तारू उद्यान या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शंभरहून अधिक गावे आहेत. या गावांतील नागरिक आणि वन्यजीव एकाच भूप्रदेशाचे सहअस्तित्व स्वीकारून जगत आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल, गौर यांसह वन्यजीवांची संख्या वाढत असताना त्यांचा गावालगतच्या भागातील वावरही वाढला आहे. त्यामुळे मुलांचे मोकळ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : घरगुती वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणाला हिंसक वळण मिळाले. धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यावर काठीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आशिष भोयर २५ वर्षे रा. केशरवाही गंभीर जखमी झाले. नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सावली तालुक्यातील केशरवाही येथे सोमवारी रात्री ही गंभीर घटना घडली.आशिष भोयर आणि रुपेश भोयर हे सख्खे भाऊ असून, घरगुती तसेच किरकोळ कारणांवरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर रुपेश याने मागून येत आशिष यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला.या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनेनंतर त्यांना तातडीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्ह...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र, कळमना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा पठाण यांच्या समर्पित व सेवाभावी वैद्यकीय कार्याचा पंचायत समिती बल्लारपूरकडून सन्मान करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या हस्ते डॉ. पठाण यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.बल्लारपूर तालुक्यातील गोरगरीब, दीन-दुबळे व गरजू रुग्णांना वेळेची पर्वा न करता वैद्यकीय सेवा देत त्यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. रुग्णांवर उपचार करण्यासोबतच त्यांना मानसिक आधार देत माणुसकीची जपणूक करणाऱ्या त्यांच्या कार्याची सन्मानपत्रातून विशेष दखल घेण्यात आली.वैद्यकीय सेवा हा केवळ व्यवसाय नसून मानवी वेदनांवर उपचार करणारे सेवाव्रत असल्याचे नमूद करत, डॉ. पठाण यांनी ज्ञान, कौशल्य, परिश्रम आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून रुग्णसेवा के...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी चंद्रपूर शहर सज्ज झाले असून, २५ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक नियमन लागू केले आहे.पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, रामनगर रोड, संत केवलराम चौक ते ईरई नदी रामसेतू पूल हा मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग मिरवणूक पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मूलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात बुधवारी सकाळी धारदार शस्त्राने ४० वर्षीय गवंडी मिस्त्रीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. नागमंदिर चौकाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीने जात असलेल्या उमेश भाऊराव मेश्राम यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने मानेवर वार केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.मृतक उमेश मेश्राम हे गवंडी मिस्त्री म्हणून काम करीत होते. ते मूळचे देऊरवाडा, ता. भद्रावती येथील रहिवासी असून सध्या शिवाजीनगर परिसरात, प्रज्ञा वाचनालयाजवळ राहत होते. बुधवारी सकाळी ते मोटारसायकलने कामासाठी घराबाहेर पडले होते. नागमंदिर चौकाजवळ पोहोचताच त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने भद्रावती पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच डीवायएसपी सचिन खेत्रे यांच्यासह पोलिसांचा ...
बातम्या -
Chandrapur
-२४ सप्टेंबर रोजी प्रियदर्शिनी सभागृहात जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सवृ असलेल्या गणेशोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महागणेशोत्सव जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्थानिक कलावंत व सांस्कृतिक पथकांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणे, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच गायन, वादन, नृत्य व नाट्यकलेच्या माध्यम...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपणाच्या नियमांचे उल्लंघन करून परवानगीविना मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर मुल पोलिसांनी कारवाई केली. आलेवाही नवेगाव परिसरात केलेल्या या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये डीजे साऊंड सिस्टिम, स्पीकर, मिक्सर, ऑडिओ मशीन, जनरेटर, पॉवर सेवर तसेच दोन वाहने असा एकूण अंदाजे २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.२२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन बंदोबस्ताच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कनाके व पोलीस पथक आलेवाही-नवेगाव परिसरात पेट्रोलिंग तसेच ध्वनीक्षेपणाच्या मर्यादेची तपासणी करीत होते. यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी परवानगीविना मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी पाहणी करून ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता तपासली. यामध्ये अनु...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / राजुरा : मारहाण तसेच अपमानास्पद शाब्दिक वर्तन केल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी चर्मकार समाजाच्या वतीने राजुरा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. सदर घटनेची सखोल चौकशी करताना घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात यावेत. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलमधील व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य उपलब्ध पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. आवश्यक असल्यास संबंधित वैद्यकीय कागदपत्रांचीही पडताळणी करावी, असे नमूद करण्यात आले.चौकशीत मारहाण, धमकी, शिवीगाळ, अपमानास्पद शाब्दिक वर्तन किंवा अन्य कोणताही गुन्हा झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजाच्...
बातम्या -
Chandrapur
- बाप्पा डॉट ऑर्ग वर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला शासनाने राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे. गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे व्यापक दस्तऐवजीकरण करून या उत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर व्यापक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्यांचे डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.यासाठी सांस्कृतिक कार...
बातम्या -
Chandrapur
- जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रमविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जिवती तालुक्यातील पाटण येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून नागरिकांना आरोग्य विभागाच्या विविध योजना, माता-बाल आरोग्य, लसीकरण, सिकलसेल व ॲनिमिया तपासणी, असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आयुष्मान भारत तसेच गरोदर मातांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.एकता बाल गणेश मंडळाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला पाटणचे सरपंच सिताराम मडावी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका अपेक्षा लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, आदिवासी निरीक्षक अमोल नवलकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष नारायण आत्राम, उपाध्यक्ष गजानन आत्राम, सचिव सुरेश मडावी, आशा स्वयंसेविका कविता वेडमे...