महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

कापूस लागवडीसाठी शेतात गेल्या अन् काळाचा घाला : आठ महिलांवर वीज कोसळली बातम्या - Chandrapur

कापूस लागवडीसाठी शेतात गेल्या अन् काळाचा घाला : आठ महिलांवर वीज कोसळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कापूस लागवडीसाठी शेतात गेलेल्या महिलांवर अचानक आभाळातून काळाचा घाला आला. ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही येथे गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या आठ महिलांवर वीज कोसळल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेने परिसर हादरला असून, एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.जना मारुती तलमले, रामरी मारुती तलमले, मनीषा रामहरी तलमले, शुभांगी सुभाष तलमले, सुभाष मारुती तलमले, मनीषा गोकुळदास ठाकरे, मेघा राकेश शेंडे आणि कविता कमलाकर पाकडे या आठ महिला वीज पडल्याने जखमी झाल्या.दुपारच्या वेळी शेतात कपाशीची लागवड सुरू असतानाच अचानक वीज कोसळली. काही क्षणांतच शेतातील वातावरणात आरडाओरड सुरू झाली. जखमी महिलांना तातडीने आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, मनीषा गोकुळदास ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दैवाने हिरावला संसाराचा आधार : वीज कोसळून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत, पत्नी गंभीर बातम्या - Chandrapur

दैवाने हिरावला संसाराचा आधार : वीज कोसळून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत, पत्नी गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातील काम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर अचानक वीज कोसळल्याची गंभीर घटना आज दुपारी ३.३० वाजता सुमारास घडली. या दुर्घटनेत ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.चेकठाणेवासना येथील केशव डोनु गुडी (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी वैशाली केशव गुडी (वय ४५) हे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. दिवसभराचे काम आटोपून दोघेही सायंकाळच्या सुमारास घरी परतत होते. दरम्यान, ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक हवामानात बदल झाला आणि त्यांच्यावर वीज कोसळली.वीजेच्या तीव्र झटक्यामुळे केशव गुडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वैशाली गुडी या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वैशाली यांना तात...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
व्यापारी मंडळ व २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन बातम्या - Chandrapur

व्यापारी मंडळ व २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगोपालांसाठी पारंपरिक तान्हा पोळा उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला बालगोपालांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन पार्थ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, माजी नगराध्यक्ष आहतेश्याम अली, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत मणियार, माजी नगरसेवक छोटू शेख, रवी कमल कॉन्टॅक्टचे संचालक संदेश चोरडिया, कांचणी अ‍ॅग्रोचे बालाजी धोबे, डॉ. काजल धोटे, २४ तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष स्नेहल पत्तीवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.तान्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर टाळावा बातम्या - Chandrapur

विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर टाळावा


- जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकसंवाद उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मोबाईल आणि इंटरनेट हे ज्ञान व माहिती मिळविण्याचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो. सोशल मीडियावर अनावश्यक वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर प्रामुख्याने अभ्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्यासाठी करावा. तसेच इंटरनेट वापरताना वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ मुजावर अली यांनी केले.जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुरलीधर बागला हायस्कूल येथे सायबर गुन्हे, सुरक्षित इंटरनेट वापर आणि पॉक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य चरणदास राठोड, जि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बांबू विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानातून शाश्वत विकासाला नवी दिशा : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामानुजम बातम्या - Chandrapur

बांबू विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानातून शाश्वत विकासाला नवी दिशा : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामानुजम


- जागतिक बांबू सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांचे मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बांबू आधारित उद्योगांना भविष्यात मोठा वाव असून, या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वन विभाग, संशोधन संस्था, उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र, शेतकरी आणि स्थानिक समुदाय यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. बांबू विकासाकडे केवळ लागवड व उत्पादनाच्या दृष्टीने न पाहता शाश्वत उपजीविका, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे साधन म्हणून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी केले.बांबू फॉर द फ्युचर फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोव्हेशन या संकल्पनेवर आधारित जागतिक बांबू सप्ताह–२०२६च्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित या सप्ताहाचा उद्देश बा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
फेक इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेची बदनामी : मुल पोलिसांत गुन्हा दाखल बातम्या - Chandrapur

फेक इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेची बदनामी : मुल पोलिसांत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिचे व नातेवाईकाचे फोटो अपलोड करत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा गंभीर प्रकार मुल येथे समोर आला आहे. याच अकाउंटवरून महिलेच्या भावालाही अश्लील भाषेत संदेश पाठवून शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी मुल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला मुल शहरात राहत असून, ती मागील काही वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता महिला मोबाईलवर इन्स्टाग्राम पाहत असताना तिच्या नावाने नावाचे बनावट अकाउंट तयार केल्याचे निदर्शनास आले. या अकाउंटवर महिलेचे तसेच तिच्या नातेवाईकाचे फोटो अपलोड करून त्यावर My Love Life असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता....

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गडचांदूरमध्ये ४२ हजारांचा गांजा जप्त : महिलेला अटक बातम्या - Chandrapur

गडचांदूरमध्ये ४२ हजारांचा गांजा जप्त : महिलेला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपुर : गडचांदूर शहरातील भंडारी कॉलनी परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत नमिता विवेकानंद बिस्वास (वय ३७), रा. भंडारी कॉलनी, वॉर्ड क्र. ४, गडचांदूर) हिला पोलिसांनी अटक केले. तिच्याकडून एकूण ८४६ ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४२ हजार ३०० रुपये आहे.पोलिस उपनिरीक्षक गणेश अनभुले यांना १५ सप्टेंबर रोजी गडचांदूर येथे एका महिलेने गांजा विक्रीसाठी आणल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.पोलिस पथकाने छापा टाकून भंडारी कॉलनीतील संशयित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी बेडरूममधील पलंगाखाली ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत प्लास्टिकच्या थैलीमध्ये गांजा सदृश हिरवट पाने, फुले व बोंडे आढळ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सिंदेवाहीतील घरफोडीचा छडा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वर्ध्यातून दोघे ताब्यात बातम्या - Chandrapur

सिंदेवाहीतील घरफोडीचा छडा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वर्ध्यातून दोघे ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या नागरिकाच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात अप.क्र. ५४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ९ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती.गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून संशयितांचा माग काढत सुनील शांताराम शिं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सपना मोरे यांची काँग्रेस विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड बातम्या - Chandrapur

सपना मोरे यांची काँग्रेस विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार सौ.सपना सिद्धार्थ मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी ही नियुक्ती केली.नियुक्तीनंतर सपना मोरे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.सपना मोरे यांच्या नियुक्तीबद्दल नगरपालिकेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष करीम, परिवहन विभाग काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नरेश मुंदडा, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश आनंद, अल्पसंख्याक विभ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सोशल मीडियावरील अनुचित कंटेंटला ब्लॉक करा : चंद्रपूर पोलिसांचे आवाहन बातम्या - Chandrapur

सोशल मीडियावरील अनुचित कंटेंटला ब्लॉक करा : चंद्रपूर पोलिसांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सोशल मीडियावर वाढत असलेल्या अनुचित व अश्लील कंटेंटपासून मुलांसह नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि गुगलवर उपलब्ध असलेल्या सुरक्षा सुविधांचा वापर करून अनुचित कंटेंटला आळा घालण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. इन्स्टाग्रामवर Settings and activity मधील Content preferences मध्ये जाऊन संवेदनशील कंटेंटचे प्रमाण कमी किंवा मर्यादित करता येते. संशयास्पद खाते आढळल्यास ते Block करून Report करण्याची सुविधा आहे. फेसबुकवर Content preferences मधील Sensitive content नियंत्रित करता येते.युट्यूबवरील Restricted Mode सुरू केल्यास अनुचित व्हिडिओंपासून बचाव करण्यास मदत होते. गुगलच्या SafeSearch सुविधेमुळे अश्लील किंवा अनुचित शोधपरिणाम फिल्टर करता येतात. अनुचित व्हिडिओ अथवा कंटेंट आढळल्यास त्याची त...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →