वाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित


- रापमंच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाने काढले आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
कोठी - अहेरी बस ९ सप्टेंबर रोजी सकाळी कारमपल्ली नाल्याजवळ पलटल्यामुळे ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. ही बस चालकाची प्रकृती बरी नसल्यामुळे वाहक चालवित असल्याची बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून गडचिरोली येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून बसच्या चालक आणि वाहकास निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले आहे.
अहेरी आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८८३५ अहेरी येथून कोठी येथे ८ सप्टेंबर रोजी पोहचली. ही बस कोठी येथे मुक्कामी राहिल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाली. मात्र चालकाची प्रकृती बिघडल्याने वाहकाने चालकाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला. यावेळी खराब रस्त्यामुळे बस वाहकाला काढता आली नाही आली रस्त्याच्या कडेला खोलगट भागात पलटली. या अपघातात ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. याबाबत राज्य परिवहन महामंडळाने बसच्या चालक व वाहकाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-12


Related Photos