महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठ विविध प्राधिकारिणींच्या निवडणूकीसाठी छाननी अखेर पात्र उमेदवारांची यादी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींच्या निवडणूकीसाठी ४९१ उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले होते. त्या सर्व
अर्जाची छाननी करण्यात आली. छाननी अखेर पात्र उमेदवारांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केली आहे.
विद्यापीठ अधिसभेवर निवडून द्यावयाच्या दहा प्राचार्य मतदारसंघासाठी २८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामध्ये एस.सी. वर्गवारीतून ३, एस.टी. वर्गवारीतून निरंक, डी.टी. / एन.टी. वर्गवारीतून२, ओ.बी.सी. वर्गवारीतून २, महिला वर्गवारीतून २, तर सर्वसाधारण वर्गवारीतून ११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
सहा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मतदारसंघासाठी २४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामध्ये एस.टी. वर्गवारीतून २, महिला वर्गवारीतून २, तर सर्वसाधारण वर्गवारीतून १० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
दहा महाविद्यालयीन अध्यापक मतदारसंघासाठी ५८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामध्ये एस.सी. वर्गवारीतून३, एस.टी. वर्गवारीतून २, डी.टी. / एन.टी. वर्गवारीतू ५, ओ.बी.सी. वर्गवारीतून ४, महिला वर्गवारीतून ३, तर सर्वसाधारण वर्गवारीतून २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
तीन विद्यापीठ अध्यापक मतदारसंघासाठी ९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामध्ये एस.टी. वर्गवारीतून १, महिला वर्गवारीतून २, तर सर्वसाधारण वर्गवारीतून २ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
दहा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघासाठी ९२ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामध्ये एस.सी. वर्गवारीतून ६, एस.टी. वर्गवारीतून ३, डी.टी. / एन.टी. वर्गवारीतून ५, ओ.बी.सी. वर्गवारीतून ४, महिला वर्गवारीतून ६, तर सर्वसाधारण वर्गवारीतून २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. विद्या परिषदेवर निवडून द्यावयाच्या सर्व विद्याशाखांसाठी २६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी एस.टी. वर्गवारीतून निरंक, सर्वसाधारण वर्गवारीतून २, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी एस.सी. वर्गवारीतून २ वैध, सर्वसाधारण वर्गवारीतून३, मानवविज्ञान विद्याशाखेसाठी डी.टी. / एन.टी. वर्गवारीतून ३, सर्वसाधारण वर्गवारीतून ३, तसेच आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेसाठी महिला वर्गवारीतून१, तर ओ.बी.सी. वर्गवारीतून २ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चार विद्याशाखांतर्गत अभ्यास मंडळावर निवडून देण्यासाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ३० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत १०८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर मानवविज्ञान विद्याशाखेत प्राप्त झालेल्या ९९ अर्जापैकी ६८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
उमेदवारांकडून प्राप्त नामांकन अर्जाची छाननी आज अधिसभागृहात करण्यात आली. कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत नामांकन छाननी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्ञानरुाोत केंद्राचे संचालक डॉ. मोहन खेरडे, सदस्य म्हणून शिक्षण विभागप्रमुख डॉ. गजानन गुल्हाने, एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ.डी.वाय. चाचरकर, वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. प्रशांत गावंडे, केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील डॉ. प्रशांत शिंगवेकर यांचा समावेश असून छाननी समितीमध्ये उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, डॉ. सुलभा पाटील, सौ. मिनल मालधुरे, श्री आर.व्ही. दशमुखे, श्री व्ही.आर. मालवीय, सहा. कुलसचिव डॉ. स्मिता साठे, डॉ. साक्षी ठाकूर, श्री दिलीप वानखडे, श्री अनिल मेश्राम या गटप्रमुखांच्या नेतृत्वाखाली कर्मचा­यांचा समावेश असलेल्या गटसमितीने छाननीचे कार्य चोखपणे केले. उपकुलसचिव श्री प्रमोद तालन व सहा. कुलसचिव श्री आर.जे. सयाम यांच्या नेतृत्वाखाली कर्मचा­यांचा समावेश असलेली गठीत कार्यालयीन व्यवस्थेने छाननीच्या संपूर्ण कार्याचे नियोजन केले.

  Print


News - Amaravati
Related Photos