दहा वर्षांचा प्रतीक्षेचा काळ संपला! दशकभरापासून बेपत्ता असलेली महिला अखेर सापडली : चंद्रपूर शहर पोलिसांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आपली व्यक्ती पुन्हा कधी भेटेल, या आशेवर तब्बल दहा वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक घटना समोर आली आहे. दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ३८ वर्षीय महिलेचा शोध घेण्यात चंद्रपूर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी या महिलेचा शोध लागल्याने दशकभरापासून सुरू असलेल्या शोधमोहिमेला यश मिळाले.
या प्रकरणी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक १२२/२०१६ अन्वये नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून पोलिसांकडून महिलेचा सातत्याने शोध घेतला जात होता. काळ लोटला, अनेक दिवस उलटले, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडला नाही. अखेर दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ३८ वर्षीय महिला मिळून आल्याने शोधकार्यात यश आले आहे.
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत पंधरे आणि महिला पोलीस अंमलदार जयश्री गुरनुले यांनी ही कामगिरी केली. पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दशकभरापासून प्रलंबित असलेल्या बेपत्ता महिलेच्या शोधाला अखेर यश मिळाले.




Petrol Price




