महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर कोलियरी मैदानाच्या विकासकामांना गती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बल्लारपूर कॉलरी मैदान येथे सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मैदानावरील सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती, बांधकामांची सद्यस्थिती तसेच आगामी कामांच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बल्लारपूर कॉलरी मैदानाचा आधुनिक पद्धतीने विकास करून परिसरातील खेळाडू आणि युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कामे सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढावा घेण्यात आला. आगामी काळात आवश्यक असलेल्या सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.

बल्लारपूर कॉलरी मैदानाच्या विकासासाठी आतापर्यंत ६ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मैदान अधिक आधुनिक, सुविधायुक्त आणि खेळाडूंसाठी उपयुक्त बनविण्यासाठी आगामी विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मैदानाच्या पुढील विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या आढावा बैठकीस वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता टांगले, उपविभागीय अभियंता संजोग मेंढे, अभियंता वैभव जोशी, भाजप दक्षिण भारतीय आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष रामिल्ला, टीपीएलचे अध्यक्ष कृष्ण नामसानी, राजू बावने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फेज-२ अंतर्गत प्रस्तावित विकासकामे पूर्ण झाल्यानंतर बल्लारपूर परिसरातील खेळाडू व युवकांना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा मिळणार असून, मैदानाला आधुनिक स्वरूप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.





  Print






Related Photos