दुचाकी चोरटा शिर्डी पोलीसांकडुन जेरबंद , तीन लाखांचा मुदेमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
शिर्डी परीसरात  मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत  होत्या. काही   दिवसापुर्वीच शिर्डी पोलीसांनी एका दुचाकी चोरांकडून २९ मोटरसायकली हस्तगत करुन मोठी कारवाई केली होती.  काही काळ दुचाकी चोरीच्या घटना थांबलेल्या होत्या.  मात्र असे असतांना परत दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने शिर्डी पोलीसांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालुन राहाता व शिर्डी परीसरातील पार्किंगमध्ये दुचाकी उभी असतांना कधी मोटरसायकला हिस्का देऊन तर कधी बनावट चावीने सहज पणे गाडी चोरणारा वाकडी परीसरात राहाणार आरुण शाम माळी (२५) यास  शिर्डी पोलीसांनी मध्यरात्रीच्या वेळी शिताफीने पकडले. 
श्रीरामपुर विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या पथकातील पोलीसांना माहिती मिळाल्यानुसार   वाकडी परीसरात माळी हा मोटरसायकलीची चोरी करुन एका शेतात उभ्या करुन व लपवुन ठेवत होता.  तो चोरी करण्याच्या तयारीत असतांनाच गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी प्रसाद साळवे, बाबासाहेब सातपुते,अजय अंधारे,बाळकृष्ण वर्पे,सचिन बैसाणे यांनी सापळा लावुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले . त्याची चौकशी केल्या नतंर त्याने तीन लाख रुपये किंमतीच्या हिरो होंडा, बजाज,पल्सर,अशा ८ दुचाकी मोटरसायकली पोलीसांना काढुन दिल्या.  मोटरसायकल चोर आरुण माळी हा पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आलेला असुन त्याला अटक करुन त्यांच्या विरोधात   भा.द.वि ३७९नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत त्याला कोणी मदत केली आहे का,  त्याचे कुणी आनखी सहकारी आहे का,  आनखी कोणी मोटरसायकली घेतली आहे का याचा तपास व चौकशी पोनि अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहे.  

देवाचे नामस्मरण करुन तो करायच चोरी 

घरातुन निघाल्यानतंर जी गाडी चोरी करायची त्या गाडी जवळ तो उभा राहात असे गळ्यात उपरणे कपाळावर टिळा लावुन जणु काही धार्मिक माणुस आहे अशा पद्धतीने तो आपले चोरीचे काम पार पाडत असे . कमी बोलणे मोजकाच जनसंपर्क या मुळे कोणाला संशय येत नसे याचा तो फायदा घेत होता.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-04


Related Photos