महत्वाच्या बातम्या

 आदिवासी प्रशिक्षण केंद्रात द्वितीय सत्राचा समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी उमेदवारांकरीता प्रशासकीय भवनातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परिक्षेची तयारीबाबत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येते. साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या द्वितीय सत्राचा समारोप बुधवारी करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या केंद्रप्रमुख भाग्यश्री वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत, विजय गराटे, डोंगरे, मडावी, तिरणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास, प्रयत्नाचे सातत्य, कठोर परीश्रम व ध्येय निश्चित करूनच आपल्याला यश मिळविता येते, असे मार्गदर्शन भाग्यश्री वाघमारे यांनी केले. याप्रसंगी कौशल्य विकास अधिकारी शैलेश भगत व विजय गराटे व सर्व शिक्षकवृंदानी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करून पुढील भविष्यासाठी सुभेच्छा दिल्यात.
प्रशिक्षणाच्या साडेतीन महिण्याच्या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यांत आले. केंद्रातील माजी प्रशिक्षणार्थी शांताराम मडावी यांना मध्य रेल्वेमध्ये नोकरी प्राप्त झाल्यामूळे त्यांचा केंद्राच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षणार्थी शितल सयाम यांनी तर आभार नितीन मडावी यांनी मानले.





  Print






News - Chandrapur




Related Photos