नक्षल्यांनी धारदार शस्त्राने केली दोन युवकांची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
नक्षल्यांनी काल मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन इसमांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील गट्टा  उपपोलिस ठाण्यापासून १ किलोमीटर अंतरावरील ताडगुडा मार्गावर घडली. सोनू पदा (३५) व सोमजी पदा (४०) दोघेही रा. उलिया, बांदे, छत्तीसगड अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त  माहितीनुसार, पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी काल सोनू पदा व सोमजी पदा यांच्या गावी जाऊन त्यांना झोपेतून उठवून बाहेर नेले व नंतर त्यांची शस्त्राने गळा कापून हत्या केली. नक्षल्यांनी दोघांचेही मृतदेह गट्टा उपपोलिस ठाण्यापासून उत्तरेस १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर फेकून ठेवले. आज सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळून आले.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-02


Related Photos