महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

नृत्य, रॅम्पवॉक अन् खेळांनी रंगला एसएनडीटीचा नवागत स्वागत सोहळा बातम्या - Chandrapur

नृत्य, रॅम्पवॉक अन् खेळांनी रंगला एसएनडीटीचा नवागत स्वागत सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा उत्साह, विविध कलागुणांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत अशा उत्साही वातावरणात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवारात नवागत विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ पार पडला. सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नृत्य, रॅम्पवॉक, खेळ आणि विविध सृजनशील उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाला आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून छत्रवीर संभाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा येथील संस्कृत विषयाच्या प्रा. डॉ. चेतना संजय पवार उपस्थित होत्या.मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. चेतना पवार यांनी शिक्षण हे महिलांच्या स...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतून पात्र मतदार वगळला जाऊ नये - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम बातम्या - Chandrapur

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतून पात्र मतदार वगळला जाऊ नये - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम


- चंद्रपूर येथे एसआयआर कार्यक्रमाचा  आढावा- मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) प्रक्रियेत कोणताही पात्र भारतीय नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, तसेच अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत येऊ नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने अत्यंत दक्षतेने, पारदर्शकपणे आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.चंद्रपूर येथील वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत चोक्कलिंगम यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआर कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देश...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गणरायाच्या उत्सवात पोलिसांचा तंत्रज्ञानाचा पहारा : गुन्हेगारांवर एआयची नजर बातम्या - Chandrapur

गणरायाच्या उत्सवात पोलिसांचा तंत्रज्ञानाचा पहारा : गुन्हेगारांवर एआयची नजर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणरायाच्या उत्सवाला गालबोट लागू नये आणि गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांवर कारवाई करतानाच तडीपार गुन्हेगारांच्या हालचालींवर आता अत्याधुनिक एआय सर्व्हेलन्स सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनी संयुक्तपणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारव...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सावली तालुक्यात पुन्हा हत्तींचा कळप : करोली-आकापूर परिसरात सतर्कतेचा इशारा बातम्या - Chandrapur

सावली तालुक्यात पुन्हा हत्तींचा कळप : करोली-आकापूर परिसरात सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोलीकडून वैनगंगा नदीमार्गे सावली तालुक्यात दाखल होणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा सावली तालुक्यातील करोली, आकापूर आणि गेवरा परिसरात प्रवेश केला आहे. हत्तींचा कळप परिसरात दाखल झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली आणि सावली तालुक्याच्या परिसरात वैनगंगा नदी ओलांडून हत्तींच्या कळपाचा वावर सुरू आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तब्बल ३२ हत्तींचा कळप जवळपास महिनाभर सावली तालुक्यात होता. या कालावधीत सोनापूर येथील एका व्यक्तीचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तसेच हत्तींच्या संचारामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.आता पुन्हा हत्तींच्या कळपाने तालुक्यात प्रवेश केल्याने...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सावलीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून कन्या शिक्षण व सुरक्षेवर मार्गदर्शन बातम्या - Chandrapur

सावलीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून कन्या शिक्षण व सुरक्षेवर मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : पंचायत समिती सावली येथे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचा मानसिक विकास, शिक्षणातील समान संधी, सुरक्षितता आणि सर्वांगीण प्रगती या विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, सहाय्यक गटविकास अधिकारी परिहार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अलंकार मरसकोल्हे, तालुका अभियान व्यवस्थापक विवेक नागरे, सावली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तिजारे, प्रशांत बंडेवार, संरक्षण अधिकारी बिंबिसार भसारकर यांची उपस्थिती होती.मार्गदर्शक म्हण...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
स्मशानभूमीलाही चोरट्यांची नजर : सोलर पंपाचे २७ हजारांचे साहित्य लंपास बातम्या - Chandrapur

स्मशानभूमीलाही चोरट्यांची नजर : सोलर पंपाचे २७ हजारांचे साहित्य लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : ज्या स्मशानभूमीत माणसाच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास पूर्ण होतो, त्या पवित्र जागेलाही चोरट्यांनी सोडले नाही. नागभीड तालुक्यातील काम्पा येथील स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायतीने उभारलेल्या सोलर ड्युअल पंपाचे वायर, लोखंडी अँगल आणि कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल २७ हजार रुपयांचे साहित्य लंपास झाले आहे.काम्पा ग्रामपंचायतीमार्फत सुमारे तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमी परिसरात सोलर ड्युअल पंप सर्व्हिस उभारण्यात आली होती. स्मशानभूमीत आवश्यक पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अज्ञात चोरट्यांनी या सुविधेवरच डल्ला मारत वायर, लोखंडी अँगल आणि कंट्रोल पॅनल कापून नेले.१६ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपासून १७ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अचानक रेल्वे डब्यात पोलिसांचा शिरकाव : श्वान पथकासह झाडाझडती, अमली पदार्थ तस्करांची धाकधूक बातम्या - Chandrapur

अचानक रेल्वे डब्यात पोलिसांचा शिरकाव : श्वान पथकासह झाडाझडती, अमली पदार्थ तस्करांची धाकधूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नेहमीप्रमाणे बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेश एक्सप्रेस थांबली आणि प्रवाशांची लगबग सुरू होती. मात्र, काही क्षणांतच रेल्वे डब्यांमध्ये पोलिसांचे पथक अचानक दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रशिक्षित श्वान पथकही होते. पोलिसांच्या अचानक प्रवेशामुळे प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाले, तर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची धाकधूक वाढली.बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्थानकावर चंद्रपूर पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक शोधमोहीम राबविली.स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक, जिल्हा पोलीस श्वान पथक तसेच जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने आंध्र प्रदेश एक्सप्रेस २०८०५ ला लक्ष्य केले. रेल्वेतील स्लीपर आणि जनरल कोचमध्ये पोलीस पथक पोहोचताच प्रवाशांच...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विश्वासाच्या नात्याला तडा : घरातील कपाटातून ९७ हजारांचा ऐवज गायब बातम्या - Chandrapur

विश्वासाच्या नात्याला तडा : घरातील कपाटातून ९७ हजारांचा ऐवज गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : नातेवाईक म्हणून घरात येणाऱ्या महिलेच्या भेटीनंतर घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याची घटना राजुरा येथे घडली. या घटनेत सुमारे ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले असून, घरमालकाने नातेवाईक महिलेवर संशय व्यक्त केला आहे. अशोक बापुराव कोवे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून राजुरा येथील पेठ वॉर्डात भाड्याच्या घरात राहतात. पत्नीचे २०२३ मध्ये निधन झाल्यानंतर मुलगी सुप्रिया हीच त्यांचा आधार होती. तिचे २०२६ मध्ये लग्न झाल्यानंतर ती अधूनमधून वडिलांकडे येत होती.तिचे आणि आईचे काही सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम कोवे यांच्या घरातील कपाटात सुरक्षित ठेवण्यात आली होती. ९ सप्टेंबर रोजी सुप्रिया दागिने व रोख रक्कम असलेली पर्स कपाटात ठेवून सासरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची मावशी कोवे यांच्या घरी आली. तिने स्वयंपाक केला आणि काही ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममधील ठेका कामगारांना दिलासा बातम्या - Chandrapur

बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममधील ठेका कामगारांना दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममधून कामावरून कमी करण्यात आलेल्या ठेका कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश सहायक श्रम आयुक्त केंद्रीय, चंद्रपूर प्रशांत सिंह यांनी दिले आहेत. कामगारांच्या हितासाठी लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेच्या बल्लारशाह लोको पायलट व ट्रेन मॅनेजर रनिंग रूमचे कंत्राट अमित फॅब्रिकेटर्स अँड एरिकेटर्स या संस्थेकडे आहे. या ठिकाणी कार्यरत ठेका कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी सहायक श्रम आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची दखल घेत श्रम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून २२ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे, मुख्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
प्रसूतीदरम्यान नवजात शिशूसह महिलेचा मृत्यू बातम्या - Chandrapur

प्रसूतीदरम्यान नवजात शिशूसह महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच महिलेचाही मृत्यू झाल्याची घटना बल्लारपूर येथील एका रुग्णालयात घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, संबंधित डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावत उपचारात कोणतीही हलगर्जी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मृत महिलेची ओळख नीलम कुमारी रणधीरकुमार सिंह, अशी झाली आहे. रणधीरकुमार सिंह हे लोको पायलट आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता नीलम कुमारी यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे सुमारे ३ वाजता त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या.कुटुंबीयांच्या माहितीनुसार, प्रसूतीदरम्यान नवजात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर नीलम कुमारी यांची प्रकृती खालावली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →