महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

गौरी विसर्जनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा भीषण हल्ला : जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावपळ बातम्या - Chandrapur

गौरी विसर्जनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा भीषण हल्ला : जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावपळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गौरी विसर्जनासाठी तलाव व नाल्याच्या परिसरात गेलेल्या महिलांवर मधमाशांच्या मोठ्या थव्याने अचानक हल्ला केल्याच्या दोन घटना मंगळवारी सकाळी घडल्या. सावली येथील गाव तलाव परिसरातील घटनेत आठ महिला जखमी झाल्या असून, कोठारी परिसरातही अनेक महिलांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गौरी विसर्जनाचा विधी अर्धवट सोडून महिलांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी सैरावैरा धाव घ्यावी लागली.सावली येथील गाव तलावावर सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तलावाच्या पाळीवर असलेल्या वडाच्या झाडावर मधमाशांचे मोठे मोहळ होते. अचानक या मोहळातून मधमाशांचा थवा बाहेर पडला आणि उपस्थित महिलांवर तुटून पडला. काही क्षणांतच परिसरात आरडाओरड व गोंधळ उडाला. मधमाशांपासून ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राष्ट्रीय लोक अदालतीत १६६९ प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा बातम्या - Chandrapur

राष्ट्रीय लोक अदालतीत १६६९ प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा


- कौटूंबिक हिंसाचाराच्या ५ प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा- प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ३ कोटी ५९ लाखविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा न्यायिक जिल्ह्यामध्ये १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये १ हजार ६६९ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली असून तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ३ कोटी ५९ लाख ९५ हजार ३०५ इतके आहे.राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपापली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. तसेच यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अवैध गोवंश वाहतुकीवर पडोली पोलिसांचा छापा : ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

अवैध गोवंश वाहतुकीवर पडोली पोलिसांचा छापा : ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पडोली पोलिसांनी कारवाई करत तीन गोवंशीय जनावरांसह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण अंदाजे ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १५ सप्टेंबर २०२६ रोजी पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करून पिकअप वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहन व तीन गोवंशीय जनावरे असा अंदाजे ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी शिवनगर वॉर्ड, घुग्घुस येथील अनिमुद्दीन गुलबुद्दीन शेख २४ वर्ष याच्याविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिब...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ओझोनच्या छिद्रात घट : २०६६ पर्यंत ओझोन थर पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता बातम्या - Chandrapur

ओझोनच्या छिद्रात घट : २०६६ पर्यंत ओझोन थर पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर दरवर्षी निर्माण होणाऱ्या ओझोनच्या छिद्राचा आकार २०२४ मध्ये तुलनेने कमी राहिला असून, ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीचे आशादायी संकेत मिळाले आहेत. नासा आणि अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, ओझोन थराची स्थिती सुधारत राहिल्यास २०६६ पर्यंत तो पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.७ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या ओझोन क्षयाच्या प्रमुख कालावधीत २०२४ मधील ओझोन छिद्राचा विस्तार १९९२ पासूनचा सातवा सर्वांत कमी विस्तार ठरला. १९९२ मध्ये ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या रसायनांचे उत्पादन व वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी ऐतिहासिक मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुरू झाली होती.२०२४ मध्ये अंटार्क्टिक प्रदेशातील ओझोन कमी झालेल्या भागाचे मासिक सरासरी क्षेत्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ओझोनच्या छिद्रात घट : २०६६ पर्यंत ओझोन थर पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता बातम्या - Chandrapur

ओझोनच्या छिद्रात घट : २०६६ पर्यंत ओझोन थर पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर दरवर्षी निर्माण होणाऱ्या ओझोनच्या छिद्राचा आकार २०२४ मध्ये तुलनेने कमी राहिला असून, ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीचे आशादायी संकेत मिळाले आहेत. नासा आणि अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, ओझोन थराची स्थिती सुधारत राहिल्यास २०६६ पर्यंत तो पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.७ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या ओझोन क्षयाच्या प्रमुख कालावधीत २०२४ मधील ओझोन छिद्राचा विस्तार १९९२ पासूनचा सातवा सर्वांत कमी विस्तार ठरला. १९९२ मध्ये ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या रसायनांचे उत्पादन व वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी ऐतिहासिक मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुरू झाली होती.२०२४ मध्ये अंटार्क्टिक प्रदेशातील ओझोन कमी झालेल्या भागाचे मासिक सरासरी क्षेत्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पाण्याविना शाळा, समस्यांत विद्यार्थी : सातारा कोमटीत युवासेनेचा आंदोलनाचा इशारा बातम्या - Chandrapur

पाण्याविना शाळा, समस्यांत विद्यार्थी : सातारा कोमटीत युवासेनेचा आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील सातारा कोमटी येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, मुतारी, शौचालय तसेच शाळेतील दैनंदिन कामांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.शाळेतील पाण्याची समस्या नवीन नसून, याबाबत यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठविताना त्यांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
मंडळ ते मुख्यालय स्तरावर होणार महसूल लोक अदालत बातम्या - Chandrapur

मंडळ ते मुख्यालय स्तरावर होणार महसूल लोक अदालत


- ७ ऑक्टो, ४ डिसें २०२६ आणि १७ फेब्रुवारी २०२७ रोजी आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली व अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने त्वरीत निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार आहे.याच अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनातसुध्दा चंद्रपूर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार आणि मंडळ स्तरावर ७ ऑक्टो व ४ डिसेंबर २०२६ रोजी आणि १७ फेब्रुवारी २०२७ रोजी महसूल लोक अदालत घेण्यात येणार आहे.अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत (चंद्रपूर, बल्लारपूर, मुल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना, राजुरा आणि जिवती) तर अपर जिल्हाधिकारी कार्याल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
रात्रीच्या अंधारात चोरीचा डाव : बल्लारपूर पोलिसांच्या धाडसाने तिघांचा मनसुबा फसला बातम्या - Chandrapur

रात्रीच्या अंधारात चोरीचा डाव : बल्लारपूर पोलिसांच्या धाडसाने तिघांचा मनसुबा फसला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या फिरून चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून बल्लारपूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री रेल्वे क्वॉर्टर परिसर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकाम परिसरात करण्यात आली. तिन्ही संशयितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्यातील पथक रात्री पेट्रोलिंग करीत होते. यावेळी रेल्वे क्वॉर्टर परिसरात एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपवून दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने आपले नाव रोशन राजू सिंगरु (वय २८), रा. धोपटाला, वार्ड क्रमांक १, जयभीम चौक, ता. राजुरा असे सांगितले. रात्रीच्या व...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दीक्षाभूमीच्या पावित्र्यासाठी आंबेडकरी समाजाचा एल्गार : १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा बातम्या - Chandrapur

दीक्षाभूमीच्या पावित्र्यासाठी आंबेडकरी समाजाचा एल्गार : १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमीचे संवर्धन, सुयोग्य विकास आणि तिचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुण-तरुणी आणि समाजबांधवांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिक डोर्लीकर यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.दीक्षाभूमीतील ऐतिहासिक बुद्ध विहार पाडण्याऐवजी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे नूतनीकरण करावे, अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता परिसरात इतर नवीन बांधकामांना प्रतिबंध घाल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विनापरवाना डीजेचा दणदणाट पडला महागात : रामनगर पोलिसांची धडक कारवाई बातम्या - Chandrapur

विनापरवाना डीजेचा दणदणाट पडला महागात : रामनगर पोलिसांची धडक कारवाई


- ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे व प्लाझ्मा साहित्य जप्त; १२.५० लाखांचा मुद्देमाल ताब्यातविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स तसेच कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशांची आणि शासनाच्या नियमांची पायमल्ली करून डीजेचा दणदणाट सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा साहित्य असा एकूण सुमारे १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डीजे व उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →