चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; १ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टी स्पीकर), प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच या साऊंड सिस्टिमच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या व बदल (Modify) करण्यात आलेल्या वाहनांच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.हा आदेश १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४ वाजेपासून १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लागू राहणार आहे. जिल्ह्यात या कालावधीत गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र अन...
बातम्या -
Chandrapur
- पालकमंत्र्यांच्या हस्ते कारागिरांना टूलकिट व बँक मंजुरी पत्रांचे वितरणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थी कारागिरांना टूलकिट व बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर व शिल्पकारांना योजनेच्या विविध लाभांची माहिती देण्यात आली.राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथे किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करून आग लावल्याची घटना २० सप्टेंबर रोजी रात्री घडली. या आगीत दुकानातील किराणा माल, टीव्ही, कूलर, फर्निचर आणि रोख रक्कम जळून खाक झाली असून सुमारे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुर्डीहेटी येथील संघराज केशव तेलसे यांचे गावात किराणा दुकान असून त्यात सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा किराणा माल साठवून ठेवण्यात आला होता. भाच्याच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तेलसे हे १८ सप्टेंबर रोजी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. घरात त्यांची आई जिजा तेलसे उपस्थित होत्या.२० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जिजा घराबाहेर आल्या असता त्यांना दुकानाच्या शटरमधून धूर निघताना दिसला. त्यांनी...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात २० सप्टेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय शोतोकॉ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शोतोकॉ कराटे महाराष्ट्राचे अध्यक्ष सेन्साई प्रशांत पिंपळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी कराटे कौशल्याचे सादरीकरण केले. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची तसेच आगामी राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी मिळाली.आगामी राष्ट्रीयस्तरीय शोतोकॉ कराटे स्पर्धा उज्जैन येथे होणार असून, या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावीत, या उद्दे...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील ग्रामपंचायत विचोडा (रे.) अंतर्गत विचोडा (बु.) येथे कथित बोगस ठरावाच्या आधारे सुरू असलेले मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास प्रवेशद्वाराच्या उद्घाटनाला विरोध करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.विचोडा (बु.) येथील मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी प्रवेशद्वार व सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा शासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे. गावात अनेक वर्षांपासून विविध जाती-धर्माचे नागरिक सलोख्याने राहत असताना काही घटकांनी संगनमत करून विशिष्ट जाती-धर्माचे प्रतीक असलेले नाव प्रवेशद्वाराला देण्याचा ठराव केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कथित ठरावाच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.स...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सामदा-नागोबा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ४७ वर्षीय गुराख्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अवघ्या चार दिवसांत वाघाच्या हल्ल्यात दुसऱ्या गुराख्याचा बळी गेल्याने सामदा परिसरासह जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातील कक्ष क्रमांक १५०१ मध्ये घडलेल्या या घटनेने मानव-वन्यजीव संघर्षाचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.हेमंत अशोक भुरसे (४७) असे मृत गुराख्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते जनावरे चारण्यासाठी जंगलालगतच्या परिसरात गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बराच वेळ उलटूनही भुरसे घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा जंगल परिसरात शोध सुरू केला.सुमारे चार ते पाच तासांच्या शोधानंतर जंगलात भुरसे यांचा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या वतीने साप व सर्पदंश प्रतिबंध आणि जनजागृती या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन २१ सप्टेंबर रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. जिल्ह्यात सर्पदंशाच्या वाढत्या घटना आणि त्यातून होणारे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा, वन्यजीव क्षेत्रातील संस्था तसेच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारिकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडली. सर्पदंश प्रतिबंध व जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीला यावेळी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने डॉ. किरण बावस्कर, गौरांग वाईकर, नितीश भांदक्कर, दिनेश खाटे, अजय यादव आण...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचवटी लॉन येथे रविवारी उत्साहात पार पडली. संस्थेचे माजी अध्यक्ष सय्यद मुजीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासदांना ९ टक्के लाभांश वितरित करण्याची माहिती देण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे उद्घाटन उमा सदाशिव तेलंग यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदन मुनगेलवार, सतीश बावणे, सदानंद उमरे, प्रभाकर काकडे, पुष्पलता दरेकर यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष सदन मुनगेलवार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवि...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथील प्रतिभावान विद्यार्थिनी कुमारी अनुष्का भास्कर फरकाडे हिची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण असून तिचे अभिनंदन करण्यात आले.अनुष्काच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान, क्रीडा शिक्षिका शबाना पठाण तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनुष्काने उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे तसेच बल्लारपूरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा विद्यालय परिवाराने व्यक्त केली. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाराष्ट्र महिला शेतकरी सबलीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बल्लारपूर तालुक्यातील जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे.महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, अनुदाने आणि कृषीविषयक सेवांचा सहज लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिला शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, कृषी सल्ला, प्रशिक्षण व मार्गदर्शन, विमा, कर्ज तसेच इतर कृषीविषयक सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. महिला बचत गट आणि शेतकरी संघटनांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, महिला शेतकऱ्...