महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  गणेश विसर्जन व्यवस्थेचा महापौरांकडून आढावा बातम्या - Chandrapur

गणेश विसर्जन व्यवस्थेचा महापौरांकडून आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन व्यवस्था सुरळीत, सुरक्षित आणि स्वच्छ राहावी, यासाठी महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी १७ सप्टेंबर रोजी शहरातील विविध विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. महापौरांनी रामसेतू लगतचे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड, संजय गांधी मार्केट परिसर, रामाळा तलाव, बाबुपेठ तसेच शहरातील इतर कृत्रिम विसर्जन तलावांना भेट देऊन तेथील व्यवस्था तपासली.यावेळी विसर्जनस्थळांवरील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, विसर्जनाची सुविधा तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था यांची पाहणी करण्यात आली. विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचीही पाहणी करण्यात आली. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जनस्थळी आवश्यक त्या सर्व म...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गोवरी डीप खाणीत २३ हजारांची चोरी : आठवड्यानंतर तक्रार दाखल बातम्या - Chandrapur

गोवरी डीप खाणीत २३ हजारांची चोरी : आठवड्यानंतर तक्रार दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : डब्ल्यूसीएलच्या गोवरी डीप कोळसा खाणीत स्टोअर रूम फोडून सुमारे २३ हजार रुपये किमतीचे जुने वेल्डिंग साहित्य, लोखंडी पाने आणि पीजोमीटरचे मीटर चोरीला गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरीची घटना १० सप्टेंबरच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असताना तब्बल एक आठवड्यानंतर, १७ सप्टेंबर रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि चोरीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यास झालेला विलंब याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.ज्ञानेश्वर एकनाथ मोहितकर ५८ वर्ष, रा. रामपूर, शिवनगर वॉर्ड क्रमांक २, राजुरा हे गोवरी डीप खाणीत मागील नऊ महिन्यांपासून सुरक्षा इंचार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते ड्युटीवर पोहोचले असता डंपर-डोझर इंचार्ज उमेश अंधारे यांनी ख...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अर्ध्या तासात घरी येतो म्हणाले अन् काळाने हिरावले : घुग्घुसच्या ट्रकचालकाचा भीषण अपघाती मृत्यू बातम्या - Chandrapur

अर्ध्या तासात घरी येतो म्हणाले अन् काळाने हिरावले : घुग्घुसच्या ट्रकचालकाचा भीषण अपघाती मृत्यू


विदर्भ न्यूज प्रतिनिधी प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवसभराची ड्युटी आटोपून घरी परतणाऱ्या घुग्घुस येथील ट्रकचालकाने रात्री मुलाला फोन करून, अर्ध्या तासात घरी पोहोचतो असे सांगितले. मुलगाही वडील घरी येण्याची वाट पाहत होता. मात्र, काही वेळातच महामार्गावरील भीषण अपघाताची बातमी आली आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुल झाले. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील उर्जाग्राम गेटजवळ आशीष बारसमोर झालेल्या अपघातात प्रदीप कुमार अमरनाथ सिंग (वय ४५, रा. घुग्घुस) यांचा मृत्यू झाला.प्रदीप सिंग हे मागील सुमारे २० वर्षांपासून ट्रकचालक म्हणून काम करीत होते. ते चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या १८ चाकी ट्रेलरवर चालक म्हणून कार्यरत होते. १६ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास ते घुग्घुस येथून ड्युटीवर गेले होते. वर्धा येथे सिमेंट पोहोचवून ते घुग्घुसकडे परतत होते.रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी मुलगा प्रिन्स याला फोन...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ओबीसींच्या हक्काच्या जनगणनेसाठी दिल्लीच्या आंदोलनाची तयारी : २० सप्टेंबरला हैदराबादेत निर्णायक बैठक बातम्या - Chandrapur

ओबीसींच्या हक्काच्या जनगणनेसाठी दिल्लीच्या आंदोलनाची तयारी : २० सप्टेंबरला हैदराबादेत निर्णायक बैठक


विदर्भ न्युज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : २०२७ च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश व्हावा, या मागणीने आता जोर धरला असून, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या ठिय्या आंदोलनाच्या नियोजनाला वेग आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ रोजी हैदराबाद येथे ओबीसींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.बेगमपेठ येथील हॉटेल टुरिझम प्लाझा येथे सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. भारत सरकारच्या जनगणना प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची तरतूद नसल्याने २०२७ च्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्याची मागणी या बैठकीत प्रमुख्याने मांडली जाणार आहे.दिल्लीतील प्रस्तावित ठिय्या आंदोलनाचे नियोजन, आंदोलनाची रूपरेषा आणि ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी आंदोलना...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चिंतामणी विद्यालयात इंजिनिअरिंग डे उत्साहात बातम्या - Chandrapur

चिंतामणी विद्यालयात इंजिनिअरिंग डे उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इंजिनिअरिंग डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेसोबतच हरित ऊर्जा, सौर ऊर्जेचा वापर आणि वीज बचतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला महावितरणच्या इलेक्ट्रिक टेस्टिंग विभाग, चंद्रपूरचे अभियंता प्रशांत ठाकरे, अभियंता बोरकर आणि विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अरुण टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेची माहिती देताना राज्यात सुमारे ९ कोटी १५ लाख वीज ग्राहक असून, महावितरणच्या माध्यमातून ४५० शहरांसह ४२ हजार गावांना वीजपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. वीज ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असल्याने विद्युत उपकरणांचा वाप...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एसएनडीटी महिला विद्यापीठात पर्यावरणपूरक गणपती निर्मिती स्पर्धा बातम्या - Chandrapur

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एसएनडीटी महिला विद्यापीठात पर्यावरणपूरक गणपती निर्मिती स्पर्धा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पर्यावरण संवर्धनाची भावना विद्यार्थिनींमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पसच्या सांस्कृतिक विभागातर्फे पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत विद्यार्थिनींनी विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक, कलात्मक आणि सर्जनशील गणपती मूर्ती साकारल्या. मूर्ती निर्मितीतून विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षणासोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर आणि सर्जनशीलतेचा संदेश दिला.कार्यक्रमाला विद्यापीठाचे संचालक डॉ. रागेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त तसेच रणरागिणी हिरकणी फाउंडेशनच्या सदस्या श्रेया व्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलाकृती...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नांदगाव पोडे येथे स्वच्छतेचा जागर : स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात बातम्या - Chandrapur

नांदगाव पोडे येथे स्वच्छतेचा जागर : स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात


विदर्भ न्युज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, या संदेशासह नांदगाव पोडे येथे गुरुवारी (१७ सप्टेंबर) सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी एकत्र येत स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले.अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार अजय मल्लेलवार, विस्तार अधिकारी पंचायत पंढरीनाथ गेडाम, विस्तार अधिकारी कृषी नितीन ढवस, ग्रामपंचायत अधिकारी नयनपाल दुधे तसेच स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक सुनील नुत्तलवार उपस्थित होते.गावातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वरोरा पंचायत समितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून जनजागृती बातम्या - Chandrapur

वरोरा पंचायत समितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून जनजागृती


विदर्भ न्युज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा पंचायत समिती येथे सखी वन स्टॉप सेंटरच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचे महत्त्व, त्यांचा मानसिक व आर्थिक विकास तसेच मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, परिवेक्षक अधिकारी अतिश चव्हाण, संरक्षण अधिकारी वरोरा ज्योती चौधरी, जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्पलाइन अभिषेक मोहुर्ले, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सोशल वर्कर प्रतिभा माडावी, सखी वन स्टॉप सेंटरच्या पॅरामेडिकल मनीषा देठे तसेच चाइल्ड हेल्पलाइन चंद्रपूरच्या केस वर्कर किरण बोहरा यांची उपस्थिती होती.यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळणे, त्यांचा मान...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवा संकल्प अभियानातून बाल संरक्षणाबाबत जनजागृती बातम्या - Chandrapur

सेवा संकल्प अभियानातून बाल संरक्षणाबाबत जनजागृती


विदर्भ न्युज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, बल्लारशाह यांच्या संयुक्त विद्यमाने बीटीएस प्लॉट, शिवाजी वॉर्ड येथील शिवा युवा बाल गणेश मंडळाच्या परिसरात १७ सप्टेंबर रोजी बाल संरक्षण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बालकांच्या संरक्षणासह बालविवाह, बालमजुरी, बालकांवरील हिंसा व अत्याचार तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सराटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा भटारकर, नगर सेविका शालू कुमरे, माया ठाकूर, रवी देवाळकर, गजानन पत...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आखूड दोर, उपासमार अन् वेदना : देवपायली जंगलात ११ गोवंश पोलिसांच्या ताब्यात बातम्या - Chandrapur

आखूड दोर, उपासमार अन् वेदना : देवपायली जंगलात ११ गोवंश पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : देवपायली जंगल परिसरात गोवंश जातीच्या पाळीव जनावरांना आखूड दोराने बांधून, अन्न-पाणी व निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था न करता उपासमारीच्या स्थितीत ठेवल्याचा गंभीर प्रकार नागभीड पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान उघडकीस आला. पोलिसांनी कारवाई करून अंदाजे ६५ हजार रुपये किमतीची ११ गोवंश जनावरे ताब्यात घेतली असून त्यांच्या देखभालीसाठी गोशाळेत दाखल केले आहे.नागभीड पोलीस ठाण्याचे पथक १५ सप्टेंबर रोजी मिंडाळा बिट परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी देवपायली जंगल परिसरात गोवंश जनावरांना निर्दयीपणे बांधून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.यावेळी जंगल परिसरात ११ गोवंश आढळून आली. ही जनावरे आखूड दोराने बांधलेली होती. तसेच त्यांच्यासाठी पुरेसे अन्न, पाणी, निवारा आणि चारापाण्याची व्यवस्था नसल्याचे पोलि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →