महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

शेतात सापडले दुर्मिळ कासव  : माणुसकी जिंकली, वनविभागाने दिले निसर्गाच्या कुशीत जीवन बातम्या - Chandrapur

शेतात सापडले दुर्मिळ कासव  : माणुसकी जिंकली, वनविभागाने दिले निसर्गाच्या कुशीत जीवन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतात अचानक आढळलेल्या दुर्मिळ इंडियन स्टार टॉर्टाइजच्या जीवाला धोका निर्माण होण्यापूर्वीच एका शेतकरी कुटुंबाच्या जागरूकतेमुळे त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीत परतण्याची संधी मिळाली. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी नाल्यालगतच्या शेतात अनिल फरकडे यांना हे दुर्मिळ कासव आढळले. त्यांनी त्याला स्वतःकडे न ठेवता तातडीने त्यांचे बंधू तथा कोठारीचे उपसरपंच सुनील फरकडे यांना माहिती दिली.सुनील फरकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनरक्षक यू. ए. घोळवे, हरणपायलीचे वनरक्षक पी. व्ही. कावळे, वनसेवक बंडू आत्राम आणि रुपेश महेशकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कासवाला सुरक्षितपणे ताब्यात घेत त्याची पाहणी केली. पाहणीत ते दुर्मिळ इंडियन स्टार टॉर्टाइज असल्याचे स्पष्ट झाले.आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर वनकर्मचाऱ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
घरातून सुरू होता हातभट्टी दारूचा धंदा : जिवती पोलिसांनी दोघांना दिला दणका बातम्या - Chandrapur

घरातून सुरू होता हातभट्टी दारूचा धंदा : जिवती पोलिसांनी दोघांना दिला दणका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिवती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झानेरी आणि मालगुडा येथे अवैध हातभट्टी मोहादारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत एकूण ३० लिटर हातभट्टी मोहादारू आणि ९० लिटर मोहासडवा, असा एकूण १२० लिटर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सखुबाई देविदास राठोड  ५६ वर्ष रा. झानेरी आणि माधव मारोती आडे ३८ वर्ष रा. मालगुडा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ सप्टेंबर रोजी पोलिसांना झानेरी येथील सखुबाई राठोड ही घरातून हातभट्टी मोहादारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तिच्या घराची पाहणी केली. यावेळी छपरीच्या एका कोपऱ्यात ५ लिटरच्या डबक्यांमध्ये २५ लिटर हातभट्टी मोहादारू आढळून आली.तसेच घागरीमध्ये ६० लिटर मोहासडवा मिळून आला. य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची व्याहाड बुज येथे भेट देत बाटवे कुटुंबाचे केले सांत्वन बातम्या - Chandrapur

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची व्याहाड बुज येथे भेट देत बाटवे कुटुंबाचे केले सांत्वन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सवली : माणुसकी आणि आपुलकीचे नाते जपत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील शोकाकुल बाटवे कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन सांत्वन केले. व्याहाड बुज येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माधवीताई बाटवे यांचा मुलगा स्व. गिरीश मधुकर बाटवे यांचे २५ ऑगस्ट २०२६ रोजी अवघ्या ३१ व्या वर्षी अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. ऐन उभारीच्या वयात काळाने घातलेल्या या अचानक घालामुळे बाटवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.या दुःखद घटनेची माहिती मिळताच डॉ. अशोकजी नेते यांनी तत्परतेने व्याहाड बुज येथील बाटवे यांच्या निवासस्थानी पोहोचून कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. गिरीशचे असे अचानक निघून जाणे अत्यंत वेदनादायी असून या कठीण प्रसं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बांबूपासून साकारला बाप्पा : पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश बातम्या - Chandrapur

बांबूपासून साकारला बाप्पा : पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश


- बीआरटीसीच्या विद्यार्थ्यांचा  बांबू टू बाप्पा अभिनव उपक्रम- चिचपल्ली येथे जागतिक बांबू सप्ताह २०२६चा शुभारंभविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली येथील विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारली आहे. बांबूटूबाप्पा या अभिनव उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून केंद्रात जागतिक बांबू सप्ताह २०२६ चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत जागतिक बांबू सप्ताह २०२६ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या तयार केलेली बांबूची गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरली.बांबूपासून पर्यावरणपूरक आणि कला...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
मुलमध्ये कुलूपबंद रेल्वे क्वार्टरमध्ये चोरी : सव्वा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास बातम्या - Chandrapur

मुलमध्ये कुलूपबंद रेल्वे क्वार्टरमध्ये चोरी : सव्वा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पोळा सणाच्या सुट्टीसाठी कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुल येथील क्वार्टरमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.सुदेश पूर्णानंद अलोणे हे रेल्वे विभागात कार्यरत असून मुल येथील रेल्वे क्वार्टरमध्ये पत्नी व मुलासह राहतात. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह क्वार्टरला कुलूप लावून चिरोली व त्यानंतर ब्रह्मपुरी येथे गेले होते.दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास अलोणे यांच्या क्वार्टरच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. त्याने तत्काळ अलोणे यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच अलोणे ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सोनापूर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट : सोमणकर बातम्या - Chandrapur

सोनापूर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट : सोमणकर


- घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची घटनास्थळी धाव , पाहणी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, जखमींच्या उपचारांची घेतली माहितीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सोनापूर येथे कालरविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बंडू सोमणकर यांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, फर्निचर व इतर वस्तू जळून खाक झाल्या.अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.या दुर्घटनेत घरातील दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ सो...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सिगारेट ओढण्यास विरोध केला म्हणून वाद : पतीला मर्डरची धमकी, महिलेवर विटेचा घाव बातम्या - Chandrapur

सिगारेट ओढण्यास विरोध केला म्हणून वाद : पतीला मर्डरची धमकी, महिलेवर विटेचा घाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घरासमोर येऊन पतीला मर्डर करतो अशी धमकी देणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर विट फेकून हल्ला करण्यात आल्याची घटना विसापूर येथे १२ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेत महिलेच्या कपाळावर तसेच डाव्या डोळ्याखाली दुखापत होऊन रक्तस्राव झाला. वर्षा विजय गिरडकर (४४), रा. साईबाबा मंदिराजवळ, वॉर्ड क्र. ५, विसापूर यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विधिसंघर्षग्रस्त बालक हा त्यांच्या घराशेजारील पडीत घराजवळ सिगारेट ओढण्यासाठी नेहमी येत होता. त्यामुळे वर्षा यांनी यापूर्वीही त्याला तेथे येऊ नये, असे बजावले होते.१२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तो त्यांच्या घरासमोर आला. त्याने वर्षा यांच्या पतीला तुझा मर्डर करतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पतीने जाब विचारला असता संबंधित बालक मारण्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आ. किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन : ९६ वर्षांची परंपरा अखंड बातम्या - Chandrapur

आ. किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन : ९६ वर्षांची परंपरा अखंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी यंदाही पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने गणरायाचे आगमन झाले. जोरगेवार कुटुंबीयांकडून गेल्या ९६ वर्षांपासून अखंडपणे गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे. त्यांच्या आजोबांनी १९३१ मध्ये सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचा वारसा आता तिसरी पिढी पुढे नेत आहे. भक्ती, श्रद्धा आणि कुटुंबातील एकोप्याच्या भावनेतून सुरू झालेली ही परंपरा काळाच्या ओघात अधिक समृद्ध होत गेली. पुढील पिढ्यांनीही ती तितक्याच श्रद्धेने जपली असून, आ. किशोर जोरगेवार यांच्या कुटुंबीयांकडून हा वारसा पुढे नेला जात आहे.गणरायाच्या आगमनानिमित्त राजमाता निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून कुटुंबीयांनी बाप्पाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सावली तालुक्यातील सोनापूर येथे भीषण गॅस स्फोट : घर जळून खाक, दोघे जखमी बातम्या - Chandrapur

सावली तालुक्यातील सोनापूर येथे भीषण गॅस स्फोट : घर जळून खाक, दोघे जखमी


- माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची तत्परता; रुग्णालयात धाव घेत जखमींच्या प्रकृतीची घेतली माहितीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सोनापूर येथे आज रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बंडू सोमणकर यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत घरातील दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बंडू सोमणकर यांच्या घरातून अचानक गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अचानक झालेल्या जोरदार स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, संपूर्ण गाव हादरून गेले. स्फोटानंतर काही क्षणांतच घराने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बंद वनउपज तपासणी गेटला दुचाकीची धडक : २८ वर्षीय युवकाचा मृत्यू बातम्या - Chandrapur

बंद वनउपज तपासणी गेटला दुचाकीची धडक : २८ वर्षीय युवकाचा मृत्यू


- गोंडमोहाळी फाट्याजवळ अपघात; याच गेटवर यापूर्वीही दोघांचा बळी, सुरक्षाव्यवस्थेअभावी नागरिकांमध्ये संतापविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रांतर्गत गोंडमोहाळी फाट्याजवळ बंद असलेल्या वनउपज तपासणी गेटला दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी १२ रात्री सुमारे ७ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्रीच्या अंधारात बंद गेट स्पष्टपणे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वाघेडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित गेटच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातात गरुदास श्रीकृष्ण जांभूळे २८ वर्षे, रा. वाघेडा यांचा मृत्यू झाला.कामानिमित्त पळसगावच्या दिशेने प्रवास -मिळालेल्या माहितीनुसार, गरुदास जांभुळे हे अनंत जांभुळे आणि दिनकर मडावी यांच्यासोबत का...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →