कळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू


- मृतकांमध्ये तीन बालकांचा समावेश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
:  जिल्ह्यातील कळमेश्वर - सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या भीषण  अपघातात ऑटोतील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृतात तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. सदर घटना आज २० सप्टेंबर रोजी  दुपारी ४ वाजताच्या सुमारास  घडली.
मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दर्ग्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.  पाचही मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.    Print


News - Nagpur | Posted : 2018-09-20


Related Photos