महत्वाच्या बातम्या

 तांबासी येथे कृषी विद्यार्थ्यांची शिवारभेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी तांबासी-कुनघाडा येथील प्रगतिशील शेतकरी गणपत सातपुते यांच्या शेताला शिवारभेट दिली. उद्यान पंडित प्रगती पुरस्कार प्राप्त गणपत सातपुते हे जिल्ह्यातील यशस्वी व प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या ३० एकर शेतीमध्ये धान, तूर, चवळी, भेंडी, टोमॅटो, वांगी, आंबा आदी विविध पिकांची लागवड केली जाते.

या शिवारभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतातील विविध पिकांची पाहणी केली. तसेच एकात्मिक शेती पद्धती, पीक नियोजन आणि पीक व्यवस्थापन याविषयी प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणपत सातपुते यांनी शेतीतील २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव कथन केला. मेहनत, संघर्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर शेतीत यश कसे मिळविले, याचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने गणपत सातपुते यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. : येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी तांबासी-कुनघाडा येथील प्रगतिशील शेतकरी गणपत सातपुते यांच्या शेताला शिवारभेट दिली. उद्यान पंडित प्रगती पुरस्कार प्राप्त गणपत सातपुते हे जिल्ह्यातील यशस्वी व प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या ३० एकर शेतीमध्ये धान, तूर, चवळी, भेंडी, टोमॅटो, वांगी, आंबा आदी विविध पिकांची लागवड केली जाते.

या शिवारभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतातील विविध पिकांची पाहणी केली. तसेच एकात्मिक शेती पद्धती, पीक नियोजन आणि पीक व्यवस्थापन याविषयी प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव मिळाला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणपत सातपुते यांनी शेतीतील २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव कथन केला. मेहनत, संघर्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर शेतीत यश कसे मिळविले, याचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने गणपत सातपुते यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.





  Print






Related Photos