महत्वाच्या बातम्या

 वर्धा ग्रंथोत्सव साहित्य चळवळीतील सोनेरी पर्व : मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


- वर्धा ग्रंथोत्सवाचा समारोप 

- विजेत्यांना पुरस्काराचे वितरण 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कथाकथन, ग्रंथ प्रदर्शनी, ग्रंथदिंडी, नाट्य महोत्सव, बाल काव्यवाचन स्पर्धा, गजल मुशायरा यासारख्या विविध कला, साहित्य, सांस्कृतिक बाबींना सामावून घेणारा वर्धा ग्रंथोत्सव वर्धेच्या साहित्य व सांस्कृतिक चळवळीतील एक सोनेरी पर्व ठरल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केले.

दोन दिवशीय वर्धा ग्रंथोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरज बारापात्रे, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.डॅा.गजानन कोटेवार, अमरावतीचे जिल्हा ग्रंथपाल डॉ.सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने उपस्थित होते.         

समारोप प्रसंगी बाल काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. बाल काव्यवाचन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक अनुक्रमे रश्मी गजभिये, कृष्णा धांदे, देवयानी बोरकर हिला प्राप्त झाले तर सावेरी डाखोरे व मयुरी तिरकुल हिला प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. यावेळी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यात वर्धा कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे, आशिष पोहाणे, जीवन बांगडे, दिलीप रोकडे, किड्स फाऊंडेशनचे मनीष जगताप, स्वप्नील वैरागडे, निवेदीका ज्योती भगत, संध्या सायंकार, सुधीर गवळी, मिलिंद जुगनाके, राजू खडतडकर, विशाखा मिश्रा, पद्मा मख, रणजित नगराळे, प्रणाली मंडलिक यांचा समावेश आहे.

नाट्य क्षेत्रातील प्रतीक सूर्यवंशी, सुनील तितरे, विकास फटिंगे, पुजा जाधव, कुमुद मधापुरे, स्वाती चुटे, पायल देशमुख, शुभांगी बोकाटे, सुविधा झोटिंग, आयुष मधापुरे, रेवांश धांदे, आदित्य धुधे, हर्ष तेलंग, जानवी ठोंबरे, अविनाश डोंगरे, विजय बाभुळकर, शंतनू नेटके, घनश्याम गुंडावर, किशोर भोवरे, जयश्री राऊत, जया इंगोले, योगिता मानकर, प्रतिभा तलमले, स्नेहा भोमले, सई शिंदे, प्रेरणा धवळे, नम्रता चुने, जोत्स्ना पाटील, दर्शना उईके, स्मिता रोहणकर, ललिता कुकडे, कल्याणी खडसे, समीर मेश्राम, संदेश डोंगरे, हिमांशू वानी, संकेत थुल, माही डोंगरे, आरती अमुलकर यांचा सन्मान करण्यात आला.

बजाज सार्वजनिक वाचनालय, राष्ट्रभाषा प्रचार समिती, सार्वजनिक वाचनालय सिंदी मेघे, सेवाग्राम वाचनालय, राष्ट्रभाषा प्रचार समिती, पॉप्युलर बुक स्टॅाल, नाट्य प्रतीक अकॅडमी, व्यक्तिमत्व विकास मंच या संस्थांचा देखील मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन संदीप चिचाटे यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी मानले.





  Print






News - Wardha




Related Photos