जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद झाले आहेत. तर एक पोलीस जखमी झाला आहे. शोपियनमधील अरहामा येथे हा हल्ला झाला आहे.
बुधवारी दुपारी अरहामा भागात गस्तीसाठी निघालेल्या पोलिसांची गाडी खराब झाली होती. रस्त्याच्या कडेला गाडी दुरूस्त करत पोलिस थांबले होते. बेसावध असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार पोलिस शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. इशफाक अहमद मीर,  जावेद अहमद भट्ट,  मोहम्मद इकबाल आणि आदिल मंजूर भट्ट अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. पोलिसांनी या गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 



  Print






News - World | Posted : 2018-08-29






Related Photos