मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा : प्रारुप यादीसाठी दावे व हरकती २६ ऑक्टोंबर पर्यंत स्वीकारणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनधी / वर्धा : दिनांक १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीसाठी दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तथापि दावे व हरकती निकाली काढणे तसेच अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंतिम मतदार यादी पुर्वीच्याच वेळापत्रकाप्रमाणे दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल. याची राजकीय पक्षांनी तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




