क्रीडा स्पर्धेत आमगाव येथिल लोकसेवा विद्यालयाच्या संघाने मुले खो-खो संघ तालुकास्तरावर प्रथम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आमगाव येथिल लोकसेवा माध्यमिक विद्यालयाच्या संघाने १४ वर्षे वयोगटातील मुलांनी खो-खो स्पर्धेत अजिंक्य राहून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवित जिल्हास्तरावर आपला प्रवेश निश्चित केला. शालेय सत्र २०२२ - २३ मध्ये घेण्यात आलेल्या देसाईगंज तालुका क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल देसाईगंज येथे करण्यात आले होते. संघ प्रशिक्षक शिक्षक सतिश प्रधान यांच्या मार्गदर्शनात खेळाडू विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून खो-खो स्पर्धेचे यश खेचून आणले या यशाबद्दल शाळेचे संस्थापक पोपटराव तित्तीरमारे मुख्याध्यापक, निलेश तित्तीरमारे आणि सर्व कर्मचारीवृंदानी संघ प्रशिक्षक शिक्षक सतिश प्रधान व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. यानंतर जिल्हास्तरावर सुद्धा यशस्वी व्हावे यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
News - Gadchiroli