जिल्हा परिषद अंतर्गत १८ नोव्हेंबर रोजी पेंशन अदालत

- संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातर्गंत शिक्षक व शिक्षकेत्तर, सेवानिवृत्त कर्मचारी, निवृत्तीवेतन कुटुंब, निवृत्ती वेतनधारक यांच्या तक्रारी/अडचणीचे निराकारण करण्याचे दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर २०२६ जिल्हा परिषद येथील समिती कक्षात पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ब्रम्हपूरी, चिमूर, जिवती, नागभीड, पोंभूर्णा, सिंदेवाही, कोरपना आणि सावली या तालूक्यातील पेंशनधारकांची, तर याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत चंद्रपूर, बल्लापूर, गोंडपिंपरी, भद्रावती, मूल, राजुरा व वरोरा या तालूक्यातील संबंधितांसाठी पेंशन अदालत होणार आहे.
त्याअनुषंगाने वर नमुद तारीख व वेळेत निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी पेंशन अदालतीकरिता उपस्थित राहावे, असे उपमुख्य कार्यकारी नुतन सावंत यांनी कळविले आहे.




Petrol Price




