चंद्रपूरच्या BRTC चिचपल्ली महोत्सवात डॉक्युमेंट्री व शॉर्ट फिल्म स्पर्धेत रत्नापूर येथील अवेज आणि अयानचे यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : वर्ल्ड बांबू वीक निमित्त चंद्रपूरमधील BRTC (बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर) चिचपल्ली येथे आयोजित चार दिवसीय महोत्सवात पार पडलेल्या डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म स्पर्धेत सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरच्या युवा फिल्ममेकर्सने खास यश मिळवले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अवेज अजीज शेख याने प्रथम क्रमांक पटकावला, तर अयान अजीज शेख याने तृतीय क्रमांक मिळवत आपल्यातील सर्जनशीलतेची चुणूक दाखवली.
चंद्रपूर येथे शुक्रवार १८ सटेबर ला पार पडलेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात मान.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, उमेश वर्मा डायरेक्टर BRTC व उपस्थित वन्य अधिकारी यांचे हस्ते या दोन्ही विजेत्यांना ट्रॉफी ,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. बांबूच्या उपयोगावर, संवर्धनावर आणि ग्रामीण विकासावर आधारित त्यांच्या या कलाकृतींचे परीक्षण करताना विशेष प्रशंसा करण्यात आली.
या यशाबद्दल अवेज आणि अयान या दोन्ही बंधूचे सर्वत्र अभिनंदन होत असून, पर्यावरण आणि कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. युवा पिढीच्या या सृजनशीलतेला मिळालेल्या या व्यासपीठामुळे बांबू संवर्धनाच्या प्रचारास अधिक बळ मिळाले आहे.




Petrol Price




