विविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध


- बॅनर, पत्रके जाळून केला निषेध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२१  ते २७  सप्टेंबरदरम्यान नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नागरिकांचा प्रखर विरोध दिसून येत आहे. बंददरम्यान नागरिकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी नक्षल्यांनी गावा - गावात पत्रके टाकून बंदबाबत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिकांनी या पत्रकांची होळी करून बंदला तिव्र विरोध दर्शविला आहे.
बामणी पोलिसमदत केंद्रांतर्गत सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर कंबलपेठा फाट्यावर नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांची नागरिकांनी होळी केली. यावेळी १५०  ते २००  नागरिक एकत्र आले होते. यावेळी नक्षल्यांच्या भुलथापांना बळी पडणार नसून नक्षल्यांचा समुळ नायनाट करण्यासाठी आम्ही सदैव प्रशासनासोबतच असल्याची भावना व्यक्त करून नक्षल्यांविरूध्द घोषणा दिल्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-24


Related Photos