महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

मुलगी शिकली, तर भविष्य घडले : जिवतीत मुलींच्या हक्कांसाठी जनजागृती बातम्या - Chandrapur

मुलगी शिकली, तर भविष्य घडले : जिवतीत मुलींच्या हक्कांसाठी जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलींना शिक्षणाची समान संधी, सुरक्षित वातावरण आणि संरक्षण मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी पंचायत समिती जिवती येथे बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचा मानसिक विकास, शिक्षणाचे महत्त्व, सुरक्षितता आणि मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी लिंगभेदाला आळा घालणे, मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, मानसिक विकासासोबत आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वरोऱ्यातील कुख्यात गुंड देवा नौकरकर याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई बातम्या - Chandrapur

वरोऱ्यातील कुख्यात गुंड देवा नौकरकर याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईअंतर्गत वरोरा येथील पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर रा. मित्र चौक, गांधी वॉर्ड, वरोरा याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.नौकरकर याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात खून, अवैध दारू, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये बदल न झाल्याने त्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सिंदेवाहीत प्रतिबंधित प्रेशरमिडचा वापर : गणेश मंडळावर गुन्हा, १५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

सिंदेवाहीत प्रतिबंधित प्रेशरमिडचा वापर : गणेश मंडळावर गुन्हा, १५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशरमिडचा वापर केल्याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी नवयुवक बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी मौजा पवनपार, ता. सिंदेवाही येथे करण्यात आली. पोलिसांनी डीजेसह वाहन व इतर साहित्य  असा एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रतिबंधित प्रेशरमिडचा वापर करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित डीजे मालक आणि गणेश मंडळाच्या कार्यकारिणीविरुद्ध पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ५७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३८(१), १३६ व ७० अन्वये...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी बातम्या - Chandrapur

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध सीबीआय चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोप, त्यांच्या चारित्र्याबाबत प्रसारित झालेली माहिती तसेच कुटुंबीयांनी केलेले जातीय भेदभाव, अपमान आणि मानसिक छळाचे आरोप याबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या सर्व बाबींची सत्यता तपासून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, कोणत्याही विद्यार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी भूमिका वंचित बहुजन आ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
रेल्वे गाडीखाली आल्याने तरुणाचा मृत्यू बातम्या - Chandrapur

रेल्वे गाडीखाली आल्याने तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी येथील ४० वर्षीय तरुणाचा रेल्वे गाडीखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी पेपर मिलजवळील रेल्वे पटरीवर घडली. जीवन हरिदास मानकर असे मृतकाचे नाव आहे. जीवन मानकर हा मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर पेपर मिलजवळील रेल्वे पटरीवर तो रेल्वे गाडीखाली आल्याने गंभीर जखमी झाला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.जीवन याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती आहे. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पत्ते खेळू न दिल्याच्या रागातून खून : आरोपीला जन्मठेप बातम्या - Chandrapur

पत्ते खेळू न दिल्याच्या रागातून खून : आरोपीला जन्मठेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : पत्ते खेळू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी सुरीने वार करून एका व्यक्तीचा खून करणाऱ्या शक्ती टेकाम याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीवर कलम ३०२ भादंवि तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा निकाल २४ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील न्यायालयात सुनावण्यात आला. शक्ती टेकाम असे आरोपीचे नाव आहे.ही घटना ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे घडली. मृतकाने आरोपी शक्ती टेकाम याला पत्ते खेळण्यास दिले नाहीत. याचा राग आल्याने टेकाम याने पत्ते खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी संतप्त झालेल्या शक्ती टेकाम याने लोखंडी सुरीने मृतकाच्या पोटात वार करू...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
तरुणीचा पाठलाग करून मोपेडला धडक; चापट मारून धमकी : आरोपीला अटक बातम्या - Chandrapur

तरुणीचा पाठलाग करून मोपेडला धडक; चापट मारून धमकी : आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिच्या मोपेडला मोटारसायकलने धडक दिल्यानंतर शिवीगाळ करून चापट मारल्याची घटना बल्लारपूर येथे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी फैजान शेख याला अटक केली.तरुणीची फैजान शेख याच्याशी पूर्वीपासून ओळख होती. मात्र, त्याचे वर्तन पसंत नसल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद करण्यास सांगितले होते. असे असतानाही तो वारंवार बोलण्याचा आग्रह धरून त्रास देत होता.गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता तरुणी आपल्या चुलत बहिणी व मैत्रिणीसोबत मोपेडने कॉलेजकडे जात होती. आरोपी फैजान शेख हा तरुणीचा वाट पाहत उभा होता. त्याने तरुणीला थांबण्याचा आवाज दिला. मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तरुणी पुढे निघाली. यानंतर आरोपी फैजानने मोटारसायकलने तिचा पाठलाग केला.कॉले...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १ कोटी ४४ लाखांची फसवणूक : रामनगर पोलिसांत तक्रार बातम्या - Chandrapur

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १ कोटी ४४ लाखांची फसवणूक : रामनगर पोलिसांत तक्रार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांकडून तब्बल १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपये घेतल्याचा प्रकार चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमा पप्पु भट यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, निखिता बारई व कल्याणी दास यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.तक्रारीनुसार, २०२४ मध्ये निखिता बारई हिने शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १० ते १५ टक्के कमिशन मिळेल, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर काही काळ परतावा मिळाल्याने विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर तक्रारदाराने विविध तारखांना निखिता हिच्याकडे मोठ्या रकमा देण्यास सुरुवात केली.२०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत विविध व्यवहारांतून सुमारे ५५ लाख रुपये दिल्याचे तक्रारदारान...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विविध कार्यकारी सहकारी संस्थेची ८१ वी वार्षिक सभा उत्साहात बातम्या - Chandrapur

विविध कार्यकारी सहकारी संस्थेची ८१ वी वार्षिक सभा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सावली : विविध कार्यकारी सहकारी संस्था, सावलीची ८१ वी वार्षिक साधारण सभा २२ सप्टेंबर रोजी संस्थेच्या आवारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी निधन झालेल्या सभासदांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेदरम्यान नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तावाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अनिल स्वामी, उपाध्यक्ष चरनदास बोम्मावार, सदस्य ईश्वर मोहुर्ले, प्रविण सुरमवार, मुरलीधर चौधरी, डिलक्स डोहणे, भुवनेश्वर बोरकर, मनोहर प्रधाने, पराग सोनुले, सुधाकरराव गाडेवार, मुक्तेश्वर भोपये, केव...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरा येथे २८ सप्टेंबरला काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा बातम्या - Chandrapur

राजुरा येथे २८ सप्टेंबरला काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवार, २८ सप्टेंबर रोजी राजुरा येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सोमवारी सकाळी १० वाजता भवानी माता मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. यावेळी विविध जनहिताच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तात...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →