महत्वाच्या बातम्या

 महाकाली मंदिराच्या विकास कामाला पुरातत्व विभागाची मंजुरी मिळवुन द्या : आमदार किशोर जोरगेवार


- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष हंसराज अहीर यांची भेट घेत केली मागणी, नियुक्ती बदल दिल्या शुभेच्छा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर : माता महाकाली मंदिराच्या ६० कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदेला प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर मंदिराच्या दुस-या टप्याच्या विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या दोनी कामाला एकत्रीतरित्या पूरातत्व विभागाची मंजुरी मिळवून देण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष हंसराज अहीर यांची भेट घेत केली आहे. माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी हंसराज अहीर यांची भेट घेतली असुन नियुक्ती झाल्या बदल त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी हंसराज अहिर यांना केली आहे. यावेळी माजी नगरसेवक बलरामजी डोडानी, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, अजय जैस्वाल, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, पूनम तिवारी आदिची उपस्थिती होती. महाकाली मंदिराच्या पहिल्या टप्यातील ६० कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदेला शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी सदर कामासाठी अद्यापही पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त झालेली नाही. तर दुस-या टप्यातील विकास कामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ७५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. सदर निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सदर मंदिराच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आमच्या मागण्यांची सरकारच्या वतीने दखल घेतल्या जात आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या अटीमुळे या विकास कामात अडचण निर्माण होत आहे. मंदिराच्या मुळ रचनेत कोणताही बदल न करता सदर विकासकामे केल्या जाणार आहे. असे असले तरी या कामाला अद्यापतरी पुरातत्व विभागाची मंजुरी  प्राप्त झालेली नाही. हा केंद्राचे विषय असल्याने आता माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा नवनियुक्त राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी यात लक्ष घातल सदर मंदिराच्या विकास कामाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील कामासाठी पुरातत्व विभागाची एकत्रीत परवाणगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी हंसराज अहीर यांची भेट घेत केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात केंद्रातील संबधित मंत्र्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos