दारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


- आठ जणांवर गुन्हे दाखल, चार आरोपींना अटक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल ३० ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली- आरमोरी मार्गावरील आय फार्म जवळ पाळत ठेवली असता, भरधाव वेगाने संशयास्पद गडचिरोलीकडे येतांना दिसून आलेल्या वाहनांना थांबवून झडती घेतली असता, वाहनातून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. यावरून ८ जणां विरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून चौघांना अटक करण्यात आली तर चार आरोपी फरार आहेत . 
मिथुन देवाजी धोडरे (२५) रा. गोंडपुरा, चामोर्शी , सचिन अशोक लांजेवार (३०) रा.गणखेडा, गोंदिया, परमेश्वर तुळशीराम कांबळे (३१) रा. तुमखेडा, गोंदिया , शाम बसूद सोनवाने (२३) रा.गणखेडा, गोंदिया असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत तर सलमान सिद्दीकी, रमेश सादूलवार,बाल्या पेंदुरवार तिन्ही रा. चामोर्शी व शंकर रॉय रा. भिक्सी , चामोर्शी हे आरोपी फरार आहेत .  
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बालकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम व त्यांच्या पथकाने केली आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-31


Related Photos