जहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण


वृत्तसंस्था / रायपूर :  जहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान उर्फ अशोक उर्फ कुमारसाय कतलामी उर्फ बाबूराव तोफा याने  छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले  आहे.  
पोलिसांनी पहाड सिंग याला   पकडणाऱ्याला २५ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये भूसुरुंग स्फोट करणे आणि नक्षलवाद्यांना शस्त्रसाठा पुरविणे ही त्याच्याकडे महत्वाची जबाबदारी होती. पहाड सिंग हा मूळचा रााजनांदगाव जिल्ह्यातील फाफामारचा रहिवासी आहे.  आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांमुळे नक्षलवाद्यांचं पोलिसांना शरण येण्याचे प्रमाण वाढलं आहे. या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आल्यानंतर त्यांना स्वताच्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाते तसंच रोजगार उपलब्ध करून दिला जातो. पहाडसिंग उर्फ बाबूरावच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे.  Print


News - World | Posted : 2018-08-23


Related Photos