महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१६७९ : सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.Astronomy

१८१४ : दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

१८२२ : ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९०६ : बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१९२३ : इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

१९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९५३  निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

१९७८ : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९७९ : दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

२००५ : इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.

१६३० : बाेस्टन, अमेरिका - बोस्टन गाव म्हणून प्रस्थापित करण्यात आले.

७ सप्टेंबर जन्म

१७९१ : आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

१८०७ : न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)

१८२२ : प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)

१८४९ : हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)Time & Calendars

१९१२ : ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९६)

१९१५ : प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)

१९२५ : तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)

१९३३ : मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.

१९३४ : बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)

१९३४ : चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)

१९४० : लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.

१९६७ : भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.

१९७० : अमेरिकन इंटरनेट उद्योजक, डिग कंपनीचे सहसंस्थापक जे एडेलसन यांचा जन्म

१९४८ : संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) २रे अध्यक्ष, अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांचा जन्म (मृत्यू : १३ मे २०२२)

१९२३ : अमेरिकन गोल्फर, LPGA चे सह-संस्थापक लुईस सुग्ज यांचा जन्म (मृत्यू : ७ ऑगस्ट २०१५)Astronomy

१९१७ : ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार जॉन कॉर्नफॉथ यांचा जन्म (मृत्यू : ८ डिसेंबर २०१३)

१९११ : बल्गेरिय देशाचे ३६वे पंतप्रधान, कमांडर आणि राजकारणी टोडोर झिव्हकोव्ह यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १९९८)

१८८९ : के.एल.एम. ऐरलाईनचे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचा जन्म (मृत्यू : ३१ डिसेंबर १९५३)

१८८७ : भारतीय संस्कृत विद्वान - पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार गोपीनाथ कविराज यांचा जन्म (मृत्यू : १२ जून १९७६)

७ सप्टेंबर मृत्यू

१६०१ : विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.

१८०९ : थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.

१९५३ : मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

१९७९  : कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)Time & Calendars

१९९१ : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)

१९९४ : इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)

१९९७ : हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)

२०२२ : भारतीय लोकनर्तक रामचंद्र मांझी यांचा मृत्यू

२०२० : भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचे निधन (जन्म: २३ मार्च १९२९)

२०२० : दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते अक्किनेनी नागार्जुन यांचे निधन (जन्म: २९ ऑगस्ट १९५९)

१९८१ : फ्लाइट सिम्युलेटरचे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचे निध





  Print






Related Photos