विविध कार्यकारी सहकारी संस्थेची ८१ वी वार्षिक सभा उत्साहात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली : विविध कार्यकारी सहकारी संस्था, सावलीची ८१ वी वार्षिक साधारण सभा २२ सप्टेंबर रोजी संस्थेच्या आवारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी निधन झालेल्या सभासदांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेदरम्यान नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तावाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अनिल स्वामी, उपाध्यक्ष चरनदास बोम्मावार, सदस्य ईश्वर मोहुर्ले, प्रविण सुरमवार, मुरलीधर चौधरी, डिलक्स डोहणे, भुवनेश्वर बोरकर, मनोहर प्रधाने, पराग सोनुले, सुधाकरराव गाडेवार, मुक्तेश्वर भोपये, केवळराम खेवलें, लताताई आकुलवार आणि योगिताताई गेडाम उपस्थित होते.
संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे आणि घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संस्थेचे व्यवस्थापक प्रविण एस. इयापुरवार यांनी केले. अध्यक्ष अनिल स्वामी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.




Petrol Price




