मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलच्या बसचा अपघात ; चालक ठार , ३० डॉक्टर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / मुंबई  :
मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला तर अन्य ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पहाटे चार वाजता केडगाव बायपासवर हा अपघात झाला. मुंबईवरुन वेरूळकडे निघालेल्या लक्झरी बसमध्ये एकूण ४० डॉक्टर प्रवास करत होते. औरंगाबादमध्ये होणा-या मेडिकल कॉन्फरन्ससाठी हे डॉक्टर निघाले होते. केडगाव बायपासजवळ भरधाव वेगात असणारी लक्झरी बस पाठीमागून कंटेनरला धडकली. या भीषण अपघातामध्ये अर्ध्या लक्झरीचा चक्काचूर झाला. यात  तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अन्य डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.

   Print


News - Rajy | Posted : 2018-09-01


Related Photos