महत्वाच्या बातम्या

 खांबाडा येथे धाडसी चोरी : चार लाख रुपयाच्या सोन्यासह चोरांचा रोख रकमेवर डल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडा या गावात मंगळवारच्या रात्री चोरट्यानी एका घरावर डल्ला मारत अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. 

सविस्तर वृत्त असे की, खांबाडा येथील  व्यावसायिक गजानन बुट्टे हे काही कामानिमित्त गणेशपुर या गावी आपल्या नातेवाईकांकडे मंगळवार ला गेले होते. तेथेच त्यांनी मुक्काम केला. बुधवारला जेव्हा ते खांबाडा येथे परतले त्यावेळेस घरातील समोरच्या दाराचे कुलूप तोडलेले त्यांना दिसले. आणि घरात चोरट्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील मंगळसूत्र, गोफ आदी आठ तोळ्यांचे दागिने आणि दुकानातील घरी असलेली एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम ही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

याची माहिती त्यांनी वरोरा पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार यांचे सह चंद्रपूर गुन्हे शाखेची चमू घटनास्थळावर पोहोचून त्यांनी घटनेची शहानिशा केली. चंद्रपूर वरून श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी  यांचे सह ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची सूत्रे हलविले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.  वरोरा शहरात दिवसेंदिनेत होत असलेल्या चोऱ्या आणि घर फोड्या हा आता चिंतेचा विषय झालेला आहे.  

  Print


News - Chandrapur
Related Photos